|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 26 %

वायू वेग : 6.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 34.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.02°C - 33.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.43°C - 31.89°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.58°C - 30.78°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.35°C - 30.23°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.13°C - 30.31°C

few clouds
Home » नागरी, राष्ट्रीय » उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा

– ८ लाख भाविक घेऊ शकतील दर्शन,
इंदूर, (०३ ऑक्टोबर) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर संकुलात विशेष बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या निर्माणानंतर सुमारे ८ लाख भाविक सहजपणे परिसराला भेट देऊ शकणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ५ ऑक्टोबर रोजी २४२.३५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण करतील.
महाकालेश्वर मंदिरात दररोज किमान दोन लाख भाविक दर्शनाला येतात. मात्र, सणासुदीच्या काळात ही संख्या दिवसाला सुमारे ३ लाखांवर जाते, तेव्हा गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते, असे उज्जैनचे जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाकालेश्वर मंदिरात भाविकांच्या सोईसाठी खास बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्यामुळे दररोज सुमारे आठ लाख भाविक मंदिरात येऊ शकतील, असे ते म्हणाले.
श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या दुसर्या टप्प्यात नीलकंठ, शक्तिपथ, अण्णा, महाराजवाडा कॉम्प्लेक्स आणि छोटा रुद्रसागर भागातील विकास कामांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात एक विशेष जागा तयार केली जात आहे, जेथून हजारो भाविक मंदिराचा कळस पाहू शकतील. महाकालेश्वर मंदिर समितीचे प्रशासक संदीप कुमार सोनी म्हणाले की, प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ताने सुसज्ज सुमारे ७०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Posted by : | on : 3 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g