किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 32.07° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 1.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.07° C
29.12°C - 32.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken cloudsपहिली स्क्वाड्रन होणार पश्चिम सीमेवर तैनात,
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर – रशियाने एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण यंत्रणेचा पुरवठा सुरू केला असून, याची पहिली स्क्वाड्रन पश्चिम सीमेवर तैनात होणार आहे. भारताला एस-४०० यंत्रणेचा पुरवठा सुरू झाल्याची घोषणा रशियन फेडरल सर्व्हिस फॉर मिलिट्री-टेक्निकल कोऑपरेशनचे (एफएसएमटीसी) संचालक दिमित्री शुगाएव्ह यांनी दुबई येथील एअर शोमध्ये केली.
एफएसएमटीसी ही रशियातील संरक्षण उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. एस-४०० च्या स्क्वाड्रनमधील मुख्य भाग भारतात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि चीनचा धोका असलेल्या हवाईक्षेत्रात ही स्क्वाड्रन तैनात केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण उद्योगातील सूत्रांनी दिली.
एस-४०० यंत्रणा हवाई आणि समुद्री मार्गाने देशात पोहोचत आहे. लवकरच ही यंत्रणा निर्धारित ठिकाणांवर तैनात केली जाईल. पुढील महिन्यात पहिली खेप देशात पोहोचेल, त्यानंतर भारतीय वायुदल पूर्वेतील आघाडीवर लक्ष केंद्रित करणार आहे. एस-४०० यंत्रणा हाताळण्यासाठी भारतीय वायुदलाच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.