|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.98° C

कमाल तापमान : 30.32° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 2.84 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.32° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 31.47°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.21°C - 30.3°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 29.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.53°C - 29.71°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.57°C - 29.92°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.61°C - 30.12°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!

विक्रीही १२ वर्षांतील सर्वाधिक,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – ऑक्टोबर महिन्यात उत्पादन क्षेत्राने जबरदस्त उसळी घेऊन १३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे आणि याच महिन्यात १२ वर्षांतील सर्वाधिक विक्री झाली आहे. यामुळे उत्पादन क्रय व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) ५८.८ टक्क्यांवर झेपावला. सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक ५६.८ टक्के होता, असे आयएचएस मार्किटने अहवालात म्हटले आहे.
वस्तू श्रेणीने घेतलेल्या उसळीमुळे हे शक्य झाले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जारी करण्यात आलेले नियंत्रण आता शिथिल झाल्याने बाजाराची स्थिती बदलली आहे आणि ऑक्टोबरमधील नवीन कामांना मागणीमुळे बळ मिळाले आहे.
दरम्यान, निर्यात आदेशांनी देखील वेग धरून ६ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. २००८ सालातील मध्यापासून विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. नियंत्रण उपाययोजना सौम्य केल्याने आणि विक्री झपाट्याने वाढल्यामुळे २००७ सालाच्या अखेरीस उद्योगांनी उत्पादनाचा वेग झपाट्याने वाढवला. उत्पादन आणि विक्री वाढत असताना, दृष्टिकोनही आता अधिक सकारात्मक होत आहे. कोरोना महामारीवर नियंत्रण येत असल्याची अपेक्षा आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्र खुले होत असल्याने उत्पादनाबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे. उत्पादन आत्मविश्‍वासाने देखील ५० महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.
खरेदीचे प्रमाण वाढल्याने येत्या काही महिन्यांत विक्रीचे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्‍वास आयएचएस मार्किटच्या अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी संचालक पॉलियाना डी लिमा यांनी व्यक्त केला. मात्र, कंपन्यांनी उत्पादनवाढीसाठी अतिरिक्त साहित्याची खरेदी केली. परंतु, कोरोना महामारीबाबत केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमुळे रोजगाराचे प्रमाण कमी झाले. सलग सातव्या महिन्यातही कामगारांची संख्या कमीच होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 3 Nov 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g