|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 32.33° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 71 %

वायू वेग : 4.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.33° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.33°C - 31.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.78°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.45°C

overcast clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवर

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवर

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर –

फेब्रुवारीपासून आणि मार्चमध्ये झालेल्या टाळेबंदीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. ऑक्टोबर महिन्यात १,०५,१५५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीसएटी संकलन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यात १९,१९३ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, तर २५,४११ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी वसूल करण्यात आला. या कालावधीत ५२,५४० कोटी रुपयांचे एकीकृत जीएसटी संकलन करण्यात आले. यात आयातीत सामानावर आकारण्यात आलेल्या २३,३७५ कोटी रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे आयातीत वस्तूंवर आकारलेल्या ९३२ कोटी रुपयांच्या सेससह एकून ८,०११ कोटी रुपयांचा सेस वसूल करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये ८० लाख जीएसटीआर-३ बी विवरणपत्र सादर करण्यात आले, असेही या निवेदनात म्हटले आहे.
नियमित तडजोडीअंतर्गत सरकारने केंद्रीय जीएसटीतील २५,०९१ कोटी, एकीकृत जीएसटीतील राज्य जीएसटीमधील १९,४२७ कोटी रुपयांची तडजोड केंद्र सरकारने केली आहे. नियमित तडजोडीअंतर्गत केंद्रीय जीएसटीतील ४४,२८५ आणि राज्य जीएसटीतील ४४,८३९ कोटी रुपयांचा एकूण महसूल केंद्र आणि राज्य सरकारला ऑक्टोबरमध्ये प्राप्त झाला, असे मंत्रालयाने सांगितले.
मागील वर्षी समान कालावधीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९५,३७९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयातीत सेवांसह देशांतर्गत व्यवहारांच्या माध्यमातून आयातीत वस्तूंवरील महसूल ९ टक्क्यांनी अधिक मिळाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील उणे १४ टक्के, उणे ८ टक्के आणि उणे ५ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनात वृद्धी झाली आणि या माध्यमातून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे अर्थमंत्रालयाने या निवेदनात म्हटले आहे.
जीएसटी संकलनात अरुणाचलची १३८ टक्के उसळी
जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन अनुक्रमे ९०,९१७ कोटी, ८७,४२२ कोटी आणि ८६,४४९ कोटी रुपये होते. ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनात १३९ टक्क्यांच्या उसळीसह अरुणाचलप्रदेश राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आघाडीवर राहिले. दादरा-नगर-हवेलीतील संकलनाने ११५ टक्के, मिझोरमने ७२ टक्के उसळी घेतली.
दिल्लीचे संकलन उणे ५ टक्के
ऑक्टोबर महिन्यात दिल्ली राज्याचे जीएसटी संकलन उणे ५ टक्के होते, तर महाराष्ट्रातील जीएसटी संकलनात केवळ ५ टक्के वृद्धी झाली.

Posted by : | on : 2 Nov 2020
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g