किमान तापमान : 31.07° C
कमाल तापमान : 33.02° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 71 %
वायू वेग : 5.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.02° C
29.12°C - 33.99°C
few clouds29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsजीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, पादत्राणांवर आजपासून १२ टक्के जीएसटी,
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर – तयार कपड्यांवर ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याचा प्रस्ताव सध्या थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे. पादत्राणांवरील जीएसटीच्या दरातील वाढ मात्र लागू होणार आहे. कोणत्याही किमतीच्या पादत्राणांवर उद्या शनिवारपासून सरसकट १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेच्या फेब्रुवारीत होणार्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. या निर्णयाला अनेक राज्यांनी तसेच व्यापारी संघटनांनी विरोध केला. सीतारामन् यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत दिल्ली, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने या निर्णयाला विरोध केला होता. सध्या मानवनिर्मित फायबरवर १८ टक्के, मानवनिर्मित यार्नवर १२ टक्के, कपड्यांवर ५ टक्के जीएसटी लागतो.