|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.75° C

कमाल तापमान : 32.91° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 49 %

वायू वेग : 6.62 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.91° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.3°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.22°C - 32.92°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.74°C - 32.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.57°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.44°C - 30.2°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?

कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?

-डीके शिवकुमार की सिद्धरामय्या, कोण असेल मुख्यमंत्री,
नवी दिल्ली, (१३ मे) – कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला राज्यात पूर्ण बहुमत मिळाले तर राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेसकडून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आमदारांना असतो परंतु, काँग्रेसमध्ये हा अधिकार आमदारांना नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या पैकी कोणाच्या नावावर काँग्रेस शिक्कामोर्तब करते हे पाहण्यासारखे आहे.
आतापर्यंत दोन्ही नेते काँग्रेस हायकमांड आणि आमदार काय निर्णय घेणार असल्याची चर्चा होती, मात्र वाढता कल पाहून सूर बदलू लागला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र याने आपले वडील सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे सांगून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे, पण शिवकुमार हे होऊ देतील का? हा मोठा प्रश्न आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील ही लढत तिसराच चेहरा समोर आणेल अशी भीती ही व्यक्त करण्यात येत आहे.
डीके शिवकुमार यांच्याबद्दल बोलायचे तर ते काँग्रेसमध्ये पक्षाचे मुख्य रणनीतीकार मानले जातात. राज्यात पक्षाची रणनीती तयार करण्याचे आणि मैदानावर आक्रमक प्रचार करण्याचे श्रेय डीके शिवकुमार यांना जाते.डीके शिवकुमार यांचा जन्म बंगळुरू येथे झाला, ते वोक्कलिंगा समुदायाचे आहेत. डीके शिवकुमार हे १९८९ पासून सतत आमदार आहेत. त्यांनी सलग ८ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. अशा स्थितीत पक्षातील अत्यंत ज्येष्ठ आणि खंबीर नेता म्हणून त्यांची ओळख आहे.मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे आघाडीवर आहेत. सिद्धरामय्या हे यापूर्वीही मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे पक्ष पुन्हा एकदा त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवू शकतो, असे मानले जात आहे. सिद्धरामय्या वरुणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपचे व्ही सोमण्णा यांचे आव्हान आहे. सिद्धरामय्या विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. ते ३००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
शिवकुमार, सिद्धरामय्यांना दिल्लीत बोलवले
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंंतर काँग्रेसच्या आमदारांना शनिवारीच बंगळुरूत बोलावण्यात आले. कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि नेते सिद्धरामय्या यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला रविवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये झाले ते कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आतापासून हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्रिपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे नाव चर्चेत आहे. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी या ठिकाणाहून सतीश जारकीहोळी हे विजयी झाले आहेत. त्यामुळे तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे येऊ शकतात, असे म्हटले जाते.
कोण आहेत सिद्धारामय्या?
काँग्रेसचे सर्वांत मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८ पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. ते काँग्रेसची पहिली पसंती असू शकतात. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणले. त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या. सात किलो तांदूळ देणारी अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू यांच्याशी लढण्यासाठी योजना आणल्या, ज्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला.
कोण आहेत डी. के. शिवकुमार?
डी. के. शिवकुमार यांनी शुक‘वारी केलेल्या ट्विटमधून कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सादर केल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीच्या ट्रेलरची चित्रफीत शेअर करून मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. २०१८ च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होती.

Posted by : | on : 13 May 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g