किमान तापमान : 29.97° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.65 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
27.88°C - 31.99°C
scattered clouds27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds– एडीआरचा अहवाल
नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमांतून निधी मिळत असतो. एक काळ असा होता की, देश-विदेशातील श्रीमंत लोक फक्त काँग्रेसलाच निधी आणि देणग्या देत असत. आता मात्र चित्र बदलले आहे. मागील काही वर्षांपासून काँग्रेला निधी मिळण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. आता तर या पक्षाकडे निवडणुका लढण्यासाठीही पर्याप्त पैसा उरला नाही आणि म्हणूनच काँग्रेसवर ‘डोनेट फॉर देश’ या नावाने मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे.
१९ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिवशी ‘डोनेट फॉर देश’ हे अभियान हाती घेण्यात आले. पक्षाला आर्थिक ताकद मिळावी, यासाठी या मोहिमेची सुरुवात केल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआरच्या आकडेवारीनुसार, राजकीय पक्षांच्या कमाईत भाजपा सर्वांत पुढे आहे. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपाच्या कमाईत प्रचंड वाढ झाली आहे. तिथेच काँग्रेसच्या कमाईत २९ टक्के घट झाली आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून देखील दर्जा गमावला. तेव्हापासून काँग्रेसच्या कमाईत सातत्याने घट झाली आहे. २०२२ मध्ये काँग्रेसला देणग्या आणि निधीच्या स्वरूपात फक्त ५४१ कोटी रुपये मिळाले होते.
६ वर्षांत काँग्रेसच्या कमाईत किती घट –
एडीआरच्या अहवालानुसार, २०१४-१५ मध्ये राजकीय निधीच्या रूपाने काँग्रेसला ७६५ कोटी रुपये मिळाले. मात्र, पुढील तीन वर्षांत या कमाईत सातत्याने घट झाली. २०१७-१८ मध्ये काँग्रेसला फक्त १९९ कोटी रुपये मिळाले. २०१९-२० मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला ९९८ कोटी रुपये फंडिंग मिळाले. नंतरच्या वर्षात काँग्रेसच्या फंडिंगमध्ये पुन्हा घट झाली. २०२१-२२ मध्ये काँग्रेसला राजकीय देणग्यांद्वारे ५४१ कोटी रुपये मिळाले.
भाजपाची सहा वर्षातील कमाई
एडीआरच्या अहवालानुसार, २०१४-१५ मध्ये भाजपाने राजकीय निधीच्या माध्यमातून ९७० कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१७-१८ मध्ये ही रक्कम वाढून १०२७ कोटी रुपये इतकी झाली. २०१९-२० लोकसभा निवडणुकीच्या वर्षात भाजपाच्या कमाईत तीन पट वाढ झाली. भाजपाच्या खात्यात ३,६२३ कोटी रुपये जमा होते. २०२१-२२ मध्ये यात थोडी घट होऊन १९१७ कोटी रुपये झाली.
संपत्तीतही भाजपा आघाडीवर
एडीआरच्या अहवालानुसार, संपत्तीतही काँग्रेस पक्ष भाजपाच्या तुलनेत खूप मागे आहे. २०२१-२२ च्या डेटानुसार भाजपाची संपत्ती सहा हजार कोटींपेक्षा जास्त आहे. काँग्रेसची संपत्ती फक्त ८०५ कोटी रुपये इतकी आहे.