|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.56° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.18° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.29°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.45°C - 30.22°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 29.67°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.49°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.53°C - 30.25°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.93°C - 29.93°C

light rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेस आमदारांच्या संख्येत झपाट्याने घसरण

काँग्रेस आमदारांच्या संख्येत झपाट्याने घसरण

– ९८९ वरून ६५८वर आली संख्या,
नवी दिल्ली, (३ मार्च) – देशाच्या अनेक राज्यांतून काँग्रेसचा प्रभाव कमी होत असताना, या पक्षाच्या आमदारांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश अशा तीन राज्यांत आता काँग्रेसची सरकारे आहेत. ईशान्य भारतातील तीन राज्यांत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात नागालॅण्डमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. त्रिपुरात फक्त तीन तर मेघालयात काँग्रेसचे पाच आमदार विजयी झाले. २०१८ मध्ये मेघालयात काँग्रेसचे २१ आमदार विजयी झाले होते, यावेळी पाच आमदार विजयी झाल्यामुळे काँग्रेसचे १६ आमदार कमी झाले. या तीन राज्यांतील विधानसभेच्या १८० पैकी काँग्रेसला फक्त ८ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या या यशाची टक्केवारी पाच टक्क्यापेक्षाही कमी आहे.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा देशातील आमदारांची एकूण संख्या ४,१२० होती. यात ९८९ काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेस आमदारांची ही टक्केवारी २४ होती. आता ती घसरत ६५८ म्हणजे जवळपास १६ टक्क्यांवर आली आहे. आतापर्यंत देशातील पाच राज्यांत काँग्रेस आमदारांची संख्या शून्य होती. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एक आमदार विजयी झाला. त्यामुळे ही संख्या ४ वर आली. दिल्ली, सिक्कीम, नागालॅण्ड आणि आंध‘प्रदेशात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. देशातील नऊ राज्यांत काँग्रेस आमदारांची संख्या १० पेक्षाही कमी आहे.
याउलट देशातील भाजपा आमदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. २०१४ मध्ये देशात भाजपा आमदारांची संख्या ९४७ म्हणजे २३ टक्के होती, २०२३ मध्ये ती १,४२१ म्हणजे ३५ टक्के झाली. २०१४ नंतर देशात विधानसभेच्या ५३ निवडणुका झाल्या, यातील फक्त १२ निवडणुका काँग्रेसला स्वबळावर वा आघाडीच्या माध्यमातून जिंकता आल्या. २०१४ नंतर काँग्रेसने बिहार, पंजाब, पुडुचेरी, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र, यातील काही राज्यांतील सरकारे काँग्रेसला नंतर आपल्याच चुकीमुळे गमवावी लागली. आता फक्त देशातील ३ राज्यांत काँग्रेसची सरकारे उरली आहे.

Posted by : | on : 4 Mar 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g