|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 48 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » कॅनडात रचला जातोय् भारतविरोधी मोठा कट

कॅनडात रचला जातोय् भारतविरोधी मोठा कट

-गुप्तचर यंत्रणा सतर्क,
नवी दिल्ली, (०८ ऑक्टोबर) – खलिस्तानी दहशतवाद्यांद्वारे कॅनडामध्ये भारताविरोधात मोठा कट रचला जात आहे. ९ ऑक्टोबर रोजी पंजाबमध्ये ‘कॅनडा थँक्स गिव्हिंग डे’ साजरा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबमध्ये केंद्र आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणा सकि‘य झाल्या आहेत. दरम्यान, खासदार सिमरनजीतसिंग मानचे कॅनडा आणि निज्जरसोबतचे पोस्टर व्हायरल होत आहे. शीख आणि मानवाधिकार प्रेमींनी ९ ऑक्टोबर रोजी ‘कॅनडासोबत थँक्स गिव्हिंग डे’ साजरा करावा, असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. हे पोस्टर फतेहगड युनिटने प्रसिद्ध केले आहे. पोस्टरवर जर्नेलसिंग भिंद्रानवाला, खासदार सिरमनजीतसिंग मान, हरदीपसिंग निज्जर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशिवाय स्थानिक नेत्यांची छायाचित्रे आहेत.
खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची जून महिन्यात कॅनडात हत्या झाली. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित तनेजा म्हणाले की, खासदार मान यांनी लोकसभेत जाण्यापूर्वी भारतीय संविधानाची शपथ घेतली होती. आता त्याच संविधानाच्या विरोधात ते देशाचे तुकडे करण्याचा कट रचत आहेत. पण, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. पंजाबमधील हिंदू-शीख बंधुत्व हे त्याचे उदाहरण आहे. सरे येथील श्री गुरू नानक गुरुद्वारामध्ये तीन भारतीय राजनैतिक अधिकार्यांच्या हत्येची मागणी करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचा अध्यक्ष हरदीपसिंग निज्जर होता. या गुरुद्वारासमोर निज्जरची हत्या करण्यात आली होती. २१ ऑक्टोबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा ‘किल इंडिया’ अशा घोषणा देत व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासासमोर कार रॅली काढण्याची योजना आखली आहे.
कॅनडात याला मोठा विरोध होत आहे. भारतीय वंशाचे जोगिंदरसिंग बसी म्हणतात की, काही लोक भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडवत आहेत. खलिस्तानी आणि कट्टरतावाद्यांना भारत तोडायचा आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडातील भारतीय राजदूताच्या हत्येसाठी लोकांना प्रवृत्त करणे, हा मोठा गुन्हा आहे.

Posted by : | on : 8 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g