किमान तापमान : 31.54° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 6.94 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.07°C - 32.99°C
few clouds28.48°C - 30.68°C
sky is clear28.18°C - 30.48°C
sky is clear28°C - 30.32°C
sky is clear27.95°C - 29.94°C
sky is clear27.81°C - 30.39°C
sky is clear-उत्तर देण्यासाठी ३० दिवसांची मुदत,
नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – वस्तू आणि सेवा कर अर्थात् जीएसटीच्या देशातील विविध कार्यालयांनी हजारो करदात्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिशींना उत्तर देण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.अनेक कंपन्यांचे जीएसटी आऊटपुट आणि देणी जुळत नाहीत, असे जीएसटी विभागाला आढळून आले. याशिवाय इनपुट टॅक्स क्रेडिट, टॅक्स क्रेडिटचा चुकीचा दावा या कारणांसाठीही नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर अधिकारी ३० सप्टेंबरनंतरही नोटीस पाठवू शकतात; परंतु त्यांना करदात्यांनी करचोरी किंवा फसवणूक झाल्याचे सिद्ध करावे लागेल.कर तज्ज्ञांनी सांगितले की, यामुळे पुढील तीन महिन्यांत खटल्यांमध्ये वाढ होईल तसेच कंपन्यांच्या रोख प्रवाहावर परिणाम होईल; कारण त्यांना अपील दाखल करण्यासाठी ठेव म्हणून एकूण कर्जाच्या १० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे.सध्या देशभरातील हजारो कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसा २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आहेत आणि त्यात कर भरणा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी जीएसटी विभागाने सर्व कंपन्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे.याआधी ६ विमा कंपन्यांना जीएसटी विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीनेही नोटीस मिळाल्याची माहिती शेअर बाजारांना दिली होती. शिवाय, सर्वांत मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकीलाही जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजारांना ही माहिती दिली.