|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.46° C

कमाल तापमान : 28.48° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.3 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.48° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.68°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.6°C - 29.81°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.78°C - 30.21°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.88°C - 29.97°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.06°C - 30.31°C

scattered clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » जूनमध्ये १२ टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन

जूनमध्ये १२ टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन

– केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती,
नवी दिल्ली, (०२ जुलै) – जून महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन १२ टक्क्यांनी वाढून १.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शनिवारी दिली. सहा वर्षांपूर्वी अप्रत्यक्ष करपद्धत लागू झाल्यानंतर एकूण जीएसटी संकलनाने चौथ्यांदा १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ मधील पहिल्या तिमाहीत सरासरी जीएसटी संकलन अनुक‘मे १.१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६९ लाख कोटी रुपये झाले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जून २०२३ मध्ये १,६१,४९७ कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल प्राप्त झाला. त्यात केंद्रीय जीएसटी ३१,०१३ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३८,२९२ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ८०,२९२ कोटी रुपये (आयातीत वस्तूंवरील ३९,०३५ कोटी रुपयांसह) आणि ११,९०० कोटी रुपयांच्या उपकराचा (आयातीत वस्तूंवरील १,०२८ कोटी रुपयांसह) समावेश आहे, असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जून २०२३ मध्ये प्राप्त झालेला महसूल हा मागील वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या समान कालावधीत या स्रोतांपासून मिळालेल्या महसुलापेक्षा १८ टक्क्यांनी जास्त आहे. एप्रिल महिन्यात १.८७ लाख कोटी रुपयांचे विक‘मी जीएसटी संकलन झाले होते. मे महिन्यात हे संकलन १.५७ लाख कोटी रुपये होते.

Posted by : | on : 2 Jul 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g