किमान तापमान : 29.78° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 70 %
वायू वेग : 8.2 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
28.15°C - 31.99°C
26.38°C - 28.42°C
26.71°C - 27.46°C
27.64°C - 28.22°C
27.47°C - 27.97°C
27.81°C - 28.7°C
अमित शाह यांचा पलटवार,
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वभारतीला दिलेल्या भेटीच्या काळात रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला होता, ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते, असा आरोप करणारे कॉंग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा अमित शाह यांनी आज मंगळवारी खरपूस समाचार घेतला. टागोरांच्या खुर्चीवर मी नाही, तर नेहरू बसले होते, अशी चपराक अमित शाह यांनी हाणली.
अमित शाह यांच्या बंगालमधील शांतीनिकेतनच्या दौर्यावरून अधीररंजन यांनी सोमवारी सभागृहात बोलताना त्यांच्यावर आरोप केला होता. यावर सर्व पुराव्यांचा दाखला देत शाह म्हणाले, मी कधीच टागोरांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. मी त्या खिडकीपाशी बसलो होतो, जिथे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि बांगलादेशच्या पंतप्रधान बसल्या होत्या.
मी टागोरांचा अपमान केला, ही गोष्टी चुकीची आहे. वस्तुस्थिती पडताळून, संपूर्ण माहिती प्राप्त करूनच सभागृहात आरोप करायला हवेत. चुकीचा आरोप करणे ही कॉंग्रेसची मानसिकताच झाली आहे. यावेळी त्यांनी शातीनिकेतनच्या कुलपतींनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा दाखला दिला. बंगाल दौर्यातील छायाचित्रांच्या हवाल्याने, आपल्यावरील आरोप किती चुकीचे आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. यावेळी अमित शाह यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांची काही छायाचित्रे संसदेत दाखविले. हे दोन्ही नेते रवींद्रनाथ टागोरांच्या सोफ्यावर बसले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला.