|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 63 %

वायू वेग : 5.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

30° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.26°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला

कुन्नूर, ९ डिसेंबर – सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात् ब्लॅक बॉक्स आज गुरुवारी सापडला असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. या दुर्घटनेत बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा बुधवारी मृत्यू झाला.
प्रशासनाने शोधमोहिमेची व्याप्ती ३०० मीटरवरून एक किलोमीटर परिघापर्यंत वाढवल्यानंतर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली. फ्लाईट डेटा रेकॉर्डरसह दोन बॉक्सेस अपघात स्थळावर सापडले. अपघाताचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स बंगळुरू किंवा दिल्लीला पाठवला जाईल, असे सूत्राने सांगितले. अपघात होण्यापूर्वी या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये नेमके काय घडले आणि अपघात नेमका कसा झाला, याची माहिती ब्लॅक बॉक्समधून समोर येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. रावत, त्यांची पत्नी आणि संरक्षण कर्मचारी प्रवास करीत असलेले हेलिकॉप्टर अचानक कोसळून त्याला भीषण आग लागली होती.
विवेक चौधरींची घटनास्थळाला भेट
भारतीय वायुदलाचे प्रमुख विवेक चौधरी यांनी आज गुरुवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सूत्राने दिली. डोंगराळ भागात हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्यानंतर ते कोसळल्याची चित्रफीत सध्या व्हायरल झाली असली तरी, ती बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरची असल्याच्या वृत्ताला वायुदलाने दुजोरा दिलेला नाही. याचे चित्रीकरण काही पर्यटकांनी केल्याचा दावा केला जात आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
कोणत्याही विमानाचा, हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळवणे ही प्राथमिकता असते. दुर्घटनेनंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. यामध्ये आकडेवारी दिलेली असते तर, आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रेकॉर्ड केले जाते. या दोन्ही बॉक्सेसला ब्लॅक बॉक्स म्हणतात.
ब्लॅक बॉक्सचा रंग प्रत्यक्षात काळा नव्हे तर, केशरी असतो. त्याचे आवरण कठीण असल्याने त्यावर आग आणि पाण्याचा परिणाम होत नाही. हा बॉक्स सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते. ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमता ३० दिवसांची असते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. विमानात बसवण्यापूर्वी कंपन्या त्याच्या अनेक चाचण्या करतात.
ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळते. ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी १९५० च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का, असा विचार करून त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात नागरी उड्डयन संचलनालयाने जानेवारी २००५पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे अनिवार्य केले आहे.
एअर मार्शल मानवेंद्रसिंह करणार दुर्घटनेची चौकशी
कुन्नूर हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मानवेंद्रसिंह हे भारतीय वायुदलाच्या ट्रेनिंग कमांडचे कमांडर आहेत आणि हेलिकॉप्टर वैमानिकही आहेत. त्यांनी २९ डिसेंबर १९८२ रोजी हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून वायुदलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी त्यांनी १ फेब्रुवारी रोजी वायदलाच्या दक्षिण वायू कमानचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. सप्टेंबरमध्ये त्यांना ऑफिसर कमांडिंग इन चीफची (ट्रेनिंग कमांड) जबाबदारी देण्यात आली.
एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्याकडे जवळपास ६६०० तासांहून अधिकच्या उड्डाचा अनुभव आहे. जवळपास चाळीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक प्रकारच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण केले आहे. सियाचीन, उत्तर पूर्व उत्तराखंड, पश्‍चिमी मरूस्थळ आणि कांगो लोकतांत्रिक गणराज्यातही उड्डाण केले आहे. ते अतिविशिष्ट सेवा मेडल, वीरचक्र आणि विशिष्ट सेवा मेडलनेही सन्मानित आहेत.
ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची प्रकृती स्थिर
४५ टक्के भाजले असल्याची माहिती
बंगळुरू – तामिळनाडूत बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुणसिंह ४५ टक्के भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी, स्थिर असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचे म्हटले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना बंगळुरू येथे हलवण्यात आले आहे.
वरुणसिंह हे उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील कन्हौली गावातील आहेत. सध्या त्यांची नेमणूक तामिळनाडूच्या वेलिंग्टनमध्ये आहे. तिथेच ते त्यांची पत्नी उमा सिंह, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास आहेत. कर्नल के. पी. सिंह यांचे ते सुपुत्र असून, वरुणसिंह यांना सैन्यदलातील सेवेचा वारसा आहे. मध्यप्रदेशमध्ये त्यांचे स्वत:चे घर असून तिथे ते वास्तव्यास होते. वरुणसिंह यांचा भाऊ तनुजसिंह भारतीय नौदलातात कार्यरत आहेत. बुधवारी ते सीडीएस बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधून कोईम्बतूरमधील सुलूरमधून वेलिंग्टनकडे जात होते.
२०२० मध्ये शौर्यचक्राने सन्मान
ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. २०२० मध्ये हवाई आणिबाणीच्या परिस्थितीत त्यांचे एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. सध्या या घटनेची माहिती लष्कराकडून कुटुंबीयांना देण्यात आली आहे. मात्र, अपघात झाल्यापासून वरुण यांची पत्नी त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे.
रावत दाम्पत्यासह १२ जवानांचे मृतदेह नेणार्‍या रुग्णवाहिकेला अपघात
कोईम्बतूर : दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ मृतकांचे पार्थिव नेणार्‍या रुग्णवाहिकेचा मार्गात अपघात झाला.
गुरुवारी सकाळी मृतकांचे पार्थिव वेलिंग्टन येथून मद्रास रेजिमेंटल सेंटरला आणले गेले. रेजिमेंटल सेंटरहून त्यांचे पार्थिव सुलूर एअरबेसला नेले जात असतानाच या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडले आणि ती अनियंत्रित होऊन पहाडावर आदळली.
या अपघातात कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाहीये. मद्रास रेजिमेंटल सेंटरपासून काही अंतरावरच हा अपघात झाला. सुलूर एअरबेसहून हे पार्थिव दिल्लीसाठी पाठविण्यात आले.

Posted by : | on : 9 Dec 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g