|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.99° C

कमाल तापमान : 29.14° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 65 %

वायू वेग : 4.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.99°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.37°C - 30.22°C

sky is clear
Home » राष्ट्रीय, संरक्षण » नौदलाने वाचविले ११ पायलट व्हेलचे प्राण!

नौदलाने वाचविले ११ पायलट व्हेलचे प्राण!

कोलंबो, (१२ फेब्रुवारी ) – श्रीलंकेतील पुट्टलम येथील समुद्रकिनार्‍यावर तीन व्हेल मृतावस्थेत आढळून आले. याबाबत मच्छिमारांनी नौदलाला माहिती दिली. तात्काळ कारवाई करत नौदलाने किनार्‍यावर अडकलेल्या आणखी ११ पायलट व्हेलला खोल पाण्यात परत आणले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशांना खोल पाण्यात नेण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलासह कंदाकुझी मच्छिमार समुदायाच्या लोकांनी तासनतास काम केले. यासाठी त्यांना व्हेल माशांना पुन्हा खोल समुद्रात नेण्यासाठी यांत्रिक बोटींचा वापर करावा लागला. तिथेच श्रीलंकेचा मत्स्य विभाग देखील मृत व्हेल माशांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांचे पोस्टमार्टम करत आहे.
समुद्री जीवशास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पायलट व्हेल बहुतेक वेळा समुद्रकिनार्‍यावर अडकून पडतात कारण ते मोठ्या कळपांमध्ये एकत्र पोहतात आणि यामुळेच कधीकधी मोठ्या संख्येने पायलट व्हेल समुद्रकिनार्‍यावर आढळतात. हा मासा २० फूट लांब असतो. २०२० मध्येही, १०० हून अधिक व्हेल श्रीलंकेतील समुद्रकिनार्‍यावर अडकले होते, त्यापैकी ३ मरण पावले, तर इतरांना पुन्हा खोल पाण्यात आणण्यात आले.
४७७ व्हेल मृतावस्थेत
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्या मुख्य भूमीपासून सुमारे ८०० किमी पूर्वेला असलेल्या चथम बेटांवर ४७७ व्हेल मृतावस्थेत आढळून आले होते. हे सर्व मासे किनार्‍यावर आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, व्हेल मासे अन्नाच्या शोधात जमिनीजवळ पोहत राहतात. जेणेकरून ते अन्नासोबत लवकर पाण्यात जाऊ शकतील. पण अन्न शोधण्यासाठी त्यांना खोल पाण्यातून उथळ पाण्यात यावे लागते. अशा परिस्थितीत ते समुद्रकिनारी अडकतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.

Posted by : | on : 12 Feb 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g