किमान तापमान : 30.48° C
कमाल तापमान : 31.49° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.23 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.49° C
28.89°C - 31.99°C
few clouds28.95°C - 32.13°C
few clouds28.77°C - 30.78°C
sky is clear29.01°C - 30.43°C
overcast clouds28.64°C - 30.45°C
broken clouds28.89°C - 30.42°C
light rainनवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – आजच्या काळात पारंपरिक युद्धात ड्रोनला खूप जास्त महत्त्व आल्याची बाब रशिया-युक्रेन युद्धातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करणारी शस्त्रास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न विविध देशांतील सैन्य करीत आहे. भारतीय नौदलाने या दिशेने मोठे यश मिळवले आहे. युद्धनौकांना सुरक्षित ठेवण्यसाठी ड्रोनविरोधी शस्त्र नौदलाने विकसित केले आहे.
स्वार्म ड्रोन्सच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणारे ३०० एमएमचे शस्त्र नौदलाने विकसित केले आहे. युद्धनौकेच्या सभोवताली सुरक्षा कवच निर्माण करण्याची क्षमता या शस्त्रात असून, ते स्वार्म ड्रोन्सचा फडशा पाडू शकते. हे शस्त्र ३०० स्टील बॉल्स सोडते आणि या माध्यमातून एकाच वेळी कित्येक ड्रोन्सला लक्ष्य करणे शक्य असल्याची माहिती कमांडर एम. एन. पाशा यांनी दिली. एके-६३० शस्त्र यंत्रणेतून स्टील बॉल्स डागले जातात. स्वार्म ड्रोनच्या विरोधात या शस्त्राची कामगिरी अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले. याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
दिल्लीत ‘स्वावलंबन-२०२३’
ज्या वेळी मोठ्या प्रमाणात लहान-मोठे ड्रोन एकाच वेळी हल्ला करतात, तेव्हा त्याला स्वार्म ड्रोन्स म्हटले जाते. दिल्लीतील भारत मंडपम् येथे भारतीय नौदल ‘स्वावलंबन-२०२३’ आयोजित केले आहे. यात नौदलाच्या डोनाम काऊंटर ड्रोन सिस्टिम प्रदर्शित करण्यात आली. ड्रोन्सची संचार व्यवस्था जाम करण्याचे वैशिष्ट्य या यंत्रणेत आहे. ही यंत्रणा पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आली. या शस्त्रास्त्र यंत्रणेने २०२१ मध्ये झालेली आयडीएक्स ही शस्त्रास्त्र स्पर्धा जिंकली आहे.