किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 31.4° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 77 %
वायू वेग : 1.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.4° C
29.12°C - 31.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken cloudsव्हाईस ऍडमिरल घोरमाडे यांची माहिती,
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर – दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिका आणि कलवरी श्रेणीतील पाणबुडीचा पुढील आठवड्यात भारतीय नौदलात समावेश केला जाणार आहे. भारतीय समुद्रात चिनी नौदलाची घुसखोरी वाढत असून, क्षेपणास्त्र विनाशिका आणि कलवरी श्रेणीतील पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता वाढणार आहे.
विशाखापट्टणम् ही विनाशिका २१ नोव्हेंबर रोजी, तर वेला ही पाणबुडी २५ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात समावेश केला जाणार असल्याची माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल सतीश घोरमाडे यांनी सांगितले. देशातील विविध गोदींमध्ये सध्या ३९ युद्धनौका आणि पाणबुड्यांची बांधणी सुरू असून, यामुळे भारताची सामुद्री शक्तीला बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सागरी सुरक्षा महत्त्वपूर्ण असून, काही देशांकडून घुसखोरी केली जात असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जागतिक आणि विभागीय शक्ती संतुलन झपाट्याने बदलत आहे. भारतीय सागरी क्षेत्रात हे बदल सर्वाधिक झपाट्याने होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
या बदलत्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाची भमता वाढवण्यासाठी नौदलाची पातळी उत्तरोत्तर वाढेल याची खात्री करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे घोरमाडे यांनी सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते विशाखापट्टणम्चा, तर नौदलप्रमुख करमबीरसिंह यांच्या हस्ते वेला पाणबुडीचा नौदलात समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.