|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.34° C

कमाल तापमान : 28.03° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 1.06 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.34° C

Weather Forecast for
Friday, 03 May

26.99°C - 30.64°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पंजाबमध्ये पाडलेल्या पाकी ड्रोनने केले होते चीनमध्ये उड्डाण

पंजाबमध्ये पाडलेल्या पाकी ड्रोनने केले होते चीनमध्ये उड्डाण

– न्यायवैद्यक विश्लेषणातील माहिती,
नवी दिल्ली, (१ मार्च) – पंजाबमधील अमृतसर सेक्टरमध्ये मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी पाडण्यात आलेल्या पाकिस्तानी ड्रोनने भारतात घुसखोरी करण्यापूर्वी चीनमध्ये तसेच पाकिस्तानमधील २८ ठिकाणांवर उड्डाण केले होते, अशी माहिती न्यायवैद्यक विश्लेषणातून समोर आल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपल्या अहवालात म्हटले आहे.
मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी बीएसएफच्या पथकाने पाकिस्तानातून आलेले ड्रोन पाडले होते. या प्रकरणाच्या तपासाचा आदेश देण्यात आला होता. हा अहवाल त्या तपासाचा भाग असल्याचे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. पाकिस्तानी क्वाडकॉप्टर ड्रोनने चीनमधील फेंग शियांग जिल्ह्यात ११ जून २०२२ रोजी उड्डाण केले होते आणि त्यानंतर २४ सप्टेंबर २०२२ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत या ड्रोनने खानवाल परिसरातील विविध ठिकाणांवर २८ वेळा उड्डाण केले होते, असे विश्लेषणातून समोर आले आहे.
बीएसएफने पाडलेल्या ड्रोनमधून या त्याने पाकिस्तान आणि चीनमध्ये उड्डाण केल्याचे पुरावे समोर आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या पाकिस्तानी ड्रोनने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवरील अमृतसर सेक्टरमधील राजाताल चौकीजवळ भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. बीएसएफने गोळीबार करून हे ड्रोन पाडले होते. त्यानंतर न्यायवैद्यक परीक्षणासाठी ते बीएसएफच्या मु‘यालयात पाठवण्यात आले होते.

Posted by : | on : 1 Mar 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g