|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.87° C

कमाल तापमान : 33.28° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 48 %

वायू वेग : 7.25 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.28° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.15°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.16°C - 32.18°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.87°C - 31.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.23°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.92°C - 29.64°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.79°C - 29.44°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी

पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी

-नाही तर लॉरेन्स बिश्नोईला सोडा,
मुंबई, (०७ ऑक्टोबर) – मुंबई पोलिसांना धमकीचा मेल आला आहे. यामध्ये अहमदाबादमधील पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी रात्री आलेल्या या मेलमध्ये पाठवणार्‍याने भारत सरकारकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी करण्यात आली आहे. बिश्नोई दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असल्याची माहिती आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे अनेक सामने होणार आहेत. ईमेलमध्ये म्हटले आहे की दहशतवादी गटाने हल्ला करण्यासाठी आधीच आपले लोक तैनात केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पाठवण्यात आला होता, ज्याची माहिती त्यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. हा मेल युरोपमधून पाठवण्यात आल्याचे समजते. पोलिस अधिकारी म्हणाले, ’आम्हाला एनआयएकडून ईमेल मिळाला आहे. याबाबत आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे. आम्हाला तो ईमेल आयडीही मिळाला आहे ज्यावरून एनआयएला ईमेल पाठवण्यात आला होता. सध्या आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रारंभिक तपासणीत, हा मेल युरोपमधून पाठवण्यात आल्याचे दिसते. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, मेलमध्ये दिलेली धमकीही खोटी असल्याचे दिसते. हा परदेशात बसलेल्या कुणाचा खोडसाळपणा असू शकतो. मात्र, सर्व क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाणार असून गरज पडल्यास सुरक्षा वाढवता येईल.
धमकी देणार्या मेलमध्ये म्हटले आहे की, ’जर सरकारने आम्हाला ५०० कोटी रुपये दिले आणि लॉरेन्स बिश्नोईला सोडले नाही तर आम्ही नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी स्टेडियम देखील उडवून देऊ. भारतात सर्व काही विकले जाते आणि आम्ही देखील काहीतरी विकत घेतले आहे. तुम्ही कितीही सुरक्षित असलात तरी आमच्यापासून सुटू शकणार नाही. तुम्हाला काही बोलायचे असेल तर या ईमेलवरच करा. उल्लेखनीय आहे की, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानेही वर्ल्ड कप सामन्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. पन्नूवर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. तीन आठवड्यांपूर्वी शाहिद निझरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी त्याने दिली होती.

Posted by : | on : 7 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g