|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.97° C

कमाल तापमान : 29.98° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.98° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.15°C - 30.46°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा

नवी दिल्ली, (१९ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. गाझामधील अल् अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
भारत आणि या प्रदेशादरम्यान असलेले अतिशय घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी या प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि खालावत चाललेल्या सुरक्षाविषयक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर भारताच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आणि सैद्धांतिक भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या परिस्थितीबाबतचा त्यांचा दृष्टीकोन पंतप्रधानांना सांगितला. त्यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली. भारताकडून पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवतावादी मदत पाठवणे सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.

Posted by : | on : 20 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g