|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.85° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 31 %

वायू वेग : 6.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 34.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.02°C - 32.5°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.43°C - 31.89°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.58°C - 30.78°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.35°C - 30.23°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.13°C - 30.31°C

few clouds
Home » नागरी, फिचर, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र

पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र

– हाती झाडू घेत स्वच्छता सेवेत श्रमदान,
– कुस्तीपटू अंकितसह स्वच्छ, निरोगी भारताचा दिला संदेश,
नवी दिल्ली, (०१ ऑक्टोबर) – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पृष्ठभूमीवर रविवारी (१ ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान करण्यात आले. या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केले. या माध्यमातून त्यांनी स्वच्छ, निरोगी भारताचा संदेश देत जनजागृती केली.
मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. मोदींनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी आणि कुस्तीपटू तसेच फिटनेस एन्फ्लूएंजर अंकित बैयनपुरिया स्वच्छ आणि स्वस्थ भारताचा संदेश देत आहेत. ७५ डे हार्ड चॅलेंजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या अंकितसह व्हिडीओ पोस्ट करून मोदींनी त्याचे कौतुक केले. मोदींनी लिहिले की, आज जेव्हा देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करीत आहे, तेव्हा अंकित बैयनपुरिया आणि मीदेखील यात सहभागी होत आहोत. फक्त स्वच्छतेच्या पलीकडे, आम्ही शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला यात महत्त्वाचे स्थान देत आहोत. ही स्वस्थ व स्वच्छ भारतासाठीची मोहीम आहे.
नरेंद्र मोदी यांनी अंकितला त्याच्या ७५ डे हार्ड चॅलेंजविषयी माहिती विचारली. ज्यावर उत्तर देताना अंकितने आपले हार्ड डे चॅलेंज सविस्तर उलगडून सांगितले होते. ७५ हार्ड या चॅलेंजमध्ये पाच लक्षवेधी मुद्दे किंबहुना नियम असतात ज्याचे पालन ७५ दिवसांसाठी करणे आवश्यक असते. या नियमांमध्ये मद्यपान, जंकफूड बंद, दररोज पुस्तकाची दहा पाने वाचणे, दररोज दोन वेळा ४५ मिनिटांचा व्यायाम अत्यावश्यक, दररोज तीन ते चार लीटर पाणी पिणे, दररोज एक सेल्फी घेणे आणि त्याद्वारे स्वत:मधील बदल पाहणे आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे, यातील एकही नियम मोडल्यास पुन्हा पहिल्यापासून नियम पाळावे लागतात.
‘मन की बात’मधून केले होते आवाहन
‘मन की बात’च्या १०५ व्या भागादरम्यान मोदी यांनी १ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता एका तासासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह, मु‘यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग घेतला.

Posted by : | on : 1 Oct 2023
Filed under : नागरी, फिचर, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g