|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकच्या पराभवावर इस्रायलच्या राजदूताची सडकून टीका

पाकच्या पराभवावर इस्रायलच्या राजदूताची सडकून टीका

नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना केवळ या दोन देशांचे क्रिकेट चाहतेच पाहत नाहीत तर इतर देशही त्यात खूप रस घेतात. विश्वचषकातील पाकिस्तानच्या पराभवावर इस्रायलकडूनही प्रतिक्रिया आली होती. पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने नुकतेच विश्वचषकातील आपले शतक गाझामध्ये राहणार्‍या लोकांना समर्पित केले होते. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेजारी देशाच्या पराभवानंतर इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलन यांनी पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे.
राजदूत नॉर गिलन यांनी पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवत हिंदीत ट्विट केले. त्यांनी लिहिले की, ’विश्वचषक २०२३ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताने जिंकला याचा आम्हाला आनंद आहे आणि पाकिस्तान आपला विजय हमास दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही. आमच्या भारतीय मित्रांनी सामन्यादरम्यान पोस्टर प्रदर्शित करून इस्रायलशी एकजूट दाखवल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलकडून प्रत्युत्तराची कारवाई केली जात आहे. युद्धसदृश परिस्थितीत आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने उत्तर गाझामध्ये राहणार्‍या लोकांना लवकरात लवकर हा परिसर रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी काळात इस्रायल गाझावर आणखी कठोर कारवाई करणार असल्याचे मानले जात आहे.
इस्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्तानशिवाय अनेक आखाती देशांनी विरोध केला होता. या संदर्भात नुकतेच पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिजवाबानचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात १३१ धावांची खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यानंतर त्याने आपली खेळी गाझामध्ये राहणार्‍या लोकांना समर्पित केली.

Posted by : | on : 15 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g