|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.98° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.28 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.83°C - 31.17°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.36°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.75°C - 29.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.56°C - 30.53°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.67°C - 30.1°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » पी-२० च्या नवव्या शिखर परिषदेचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

पी-२० च्या नवव्या शिखर परिषदेचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

नवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जी-२० देशांच्या सांसदीय प्रमुखांच्या नवव्या शिखर परिषदेचे (पी-२०) उद्घाटन होणार आहे. द्वारका येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्स्पो सेंटर यशोभूमी येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून, या संमेलनाचा मुख्य विषय एक पृथ्वी, एक परिवार आणि एका भविष्यासाठी संसद आहे.
या परिषदेसाठी जी-२० देशांसह २६ देशातील संसदेचे अध्यक्ष, १० उपाध्यक्ष, एक समिती सभापती आणि आयपीयूच्या अध्यक्षांचे दिल्लीत आगमन झाले आहे. पॅन आफ्रिकी संसदेचे अध्यक्षही पहिल्यांदाच या परिषदेत सहभागी होत आहे. उद्घाटन सत्रानंतर १३ ऑक्टोबरला परदेशी प्रतिनिधींना नवीन संसदभवन दाखवले जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणे, महिलांमध्ये नेतृत्व विकास करणेे, सातत्यपूर्ण विकासाचे लक्ष्य जलदगतीने गाठणे आणि सतत ऊर्जा परिवर्तन या चार विषयावर या परिषदेत वेगवेगळ्या सत्रांत चर्चा होणार आहे. भारतातील प्राचीन आणि सहभागी लोकशाही परंपरांची माहिती देण्यासाठी लोकशाहीची जननी नावाने एका प्रदर्शनीचेही यशोभूमी येथे आयोजन करण्यात आले आहे.

Posted by : | on : 12 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g