किमान तापमान : 31.01° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 4.52 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
29.12°C - 32.99°C
sky is clear29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsअमित शाह यांचा पाकिस्तानला दम,
पणजी, १४ ऑक्टोबर – जम्मू-काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुरुवारी पाकिस्तानला दिला.
कोणीही आमच्यावर केलेले हल्ले आम्ही कदापि खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू, असे अमित शाह म्हणाले. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती. मात्र, आता ती वेळ राहिली नसून, आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही गृहमंत्री शाह म्हणाले.
भारतातील उरी, पठाणकोट आणि गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.
गोव्यातील विधानसभा निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार असून, स्पष्ट बहुमताने पुन्हा एकदा विजयी होणार आहे. गोव्यातील जनतेला फक्त भाजपावर विश्वास आहे. ते इतर कोणत्याही पक्षाला संधी देणार नाही.