|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.51° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.13°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.26°C - 31.36°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.9°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.73°C - 29.92°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.77°C - 29.73°C

light rain
Weather Forecast for
Friday, 24 May

28.7°C - 29.89°C

light rain
Home » राष्ट्रीय, संरक्षण » बेजबाबदार देशाकडून ‘यूएनक्लॉज’ची चुकीची व्याख्या

बेजबाबदार देशाकडून ‘यूएनक्लॉज’ची चुकीची व्याख्या

राजनाथसिंह यांची चीनवर टीका, आयएनएस विशाखापट्टणम् नौदलात दाखल,
मुंबई, २१ नोव्हेंबर – काही बेजबाबदार देश त्यांच्या संकुचित पक्षपाती हितसंबंध आणि वर्चस्ववादी प्रवृत्ती जपण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामुद्री कायद्यांचा (यूएनक्लॉज) चुकीचा अर्थ लावत आहेत, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज रविवारी येथे केली. राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रोजेक्ट-१५ बी मधील शत्रूला गुंगारा देण्याची क्षमता असलेली पहिली दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस विशाखापट्टणम् आज औपचारिकरीत्या नौदलाला सोपवण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याला ते संबोधित करीत होते.
नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात राजनाथसिंह यांना मानवंदना देण्यात आली. भारतीय नौदल, स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांत आघाडीवर आहे, असे राजनाथसिंह यांनी याप्रसंगी सांगितले. ज्या वेगाने यश मिळत आहे, तो वेग कायम ठेवला पाहिजे. सरकार सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
भारत हा भारत-प्रशांत मार्गाचा भाग असल्याने नौदलाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागर’ धोरणात याच तत्त्वांचा समावेश आहे. भारताला स्वदेशी जहाज बांधणीचे केंद्र बनवण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. काही बेजबाबदार देश संकुचित पक्षपाती हितसंबंध जपण्यासाठी यूएनक्लॉज-१९८२ मधील नैतिकतेचे उल्लंघन करीत आहेत, अशी टीका त्यांनी चीनचे नाव न घेता करताना, भारत एक जबाबदार भागधारक म्हणून जलवाहतुकीतील स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि भारत-प्रशांतबाबतच्या जागतिक मूल्यांवर विश्‍वास ठेवतो, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
‘विशाखापट्टणम्’ची ठळक वैशिष्ट्ये
ऋ ७७ टक्के स्वदेशी उपकरणांचा वापर
ऋ स्वदेशी पोलाद डीएमआर-२४९ एचा वापर
ऋ लांबी १६३ मीटर
ऋ वजन ७४०० टनांपेक्षा जास्त
ऋ विविध मोहिमा राबवण्यास सक्षम
ऋ दोन हेलिकॉप्टर्स ठेवण्याची व्यवस्था
ऋ शक्तिशाली वायू प्रणोदन इंजिनमुळे कमाल वेग
३० नॉट्‌सपेक्षा जास्त विनाशिकेतील शस्त्रास्त्रे
शस्त्रे आणि संवेदकांनी सज्ज असलेल्या नौकेत जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि कमी पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्‌स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि कम्युनिकेशन सूटचा वापर.

Posted by : | on : 22 Nov 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g