|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.68° C

कमाल तापमान : 29.55° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 75 %

वायू वेग : 3.44 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.55° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.64°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.48°C - 29.63°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.89°C - 30.3°C

scattered clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणूकीसाठी जर्मनीला आमंत्रण

भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणूकीसाठी जर्मनीला आमंत्रण

राजनाथ सिंह यांची बोरिस पिस्टोरियसह द्विपक्षीय चर्चा,
नवी दिल्ली, (६ जून) – द्विपक्षीय चर्चेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या जर्मन समकक्षांचे दिल्ली कँटमधील माणेकशॉ सेंटरमध्ये स्वागत केले. येथे त्यांनी तिन्ही लष्कराच्या गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. यानंतर संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेले शिष्टमंडळ-स्तरीय बैठक झाली. जर्मनीचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्रालयाचे राज्य सचिव बेनेडिक्ट झिमर यांनी केले तसेच वरिष्ठ अधिकारी आणि भारतातील जर्मनीचे राजदूत उपस्थित होते. २०१५ नंतर जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
राजनाथ सिंह आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, विशेषतः औद्योगिक भागीदारी वाढवण्यासाठी चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू संरक्षण कॉरिडॉरमध्ये जर्मन गुंतवणुकीचे निमंत्रण दिले. रक्षा मंत्री यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील दोन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जर्मन गुंतवणुकीच्या संभाव्यतेसह संरक्षण उत्पादन क्षेत्रात उघडलेल्या संधींवर प्रकाश टाकला. भारताचे कुशल कामगार आणि स्पर्धात्मक खर्च आणि जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यामुळे संबंध आणखी मजबूत होऊ शकतात, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. दोन्ही मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्य क्रियाकलापांचा आढावा घेतला आणि विशेषतः संरक्षण औद्योगिक भागीदारी वाढवण्याचे मार्ग शोधले.
भारत आणि जर्मनी यांच्यात २००० पासून धोरणात्मक भागीदारी आहे, जी २०११ पासून सरकारांच्या पातळीवर आंतर-सरकारी सल्लामसलत करून मजबूत केली जात आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी जर्मनीचे संघीय संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी आज सकाळी प्रथम राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पिस्टोरियस दोन दिवस नवी दिल्लीत असतील आणि ते इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स द्वारे आयोजित कार्यक्रमादरम्यान काही संरक्षण स्टार्टअप्सना भेटतील. ७ जून रोजी ते मुंबईला भेट देतील, जेथे ते मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड आणि मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला भेट देतील.
राजनाथ सिंह यांची बोरिस पिस्टोरियसह द्विपक्षीय चर्चा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे जर्मन समकक्ष बोरिस पिस्टोरियस यांची मंगळवारी नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. बैठकीत औद्योगिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करून अनेक द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पिस्टोरियस चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर आहेत. दिल्लीत राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत माणेकशॉ सेंटरवर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रीय राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही त्यांनी पुष्पहार अर्पण केला. सोमवारी राष्ट्रीय राजधानीत आलेले पिस्टोरियस हे जर्मन शिष्टमंडळासोबत आहेत. संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, नवी दिल्ली येथे इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स द्वारे आयोजित कार्यक्रमादरम्यान पिस्टोरियस काही संरक्षण स्टार्ट-अप्सना भेटण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मते, भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय संबंध समान लोकशाही तत्त्वांवर आधारित आहेत आणि उच्च स्तरावरील विश्वास आणि परस्पर आदराने चिन्हांकित आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर जर्मनीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणार्‍या पहिल्या देशांपैकी भारत एक होता. बुधवारी म्हणजेच ७ जून रोजी जर्मनीचे संरक्षण मंत्री मुंबईला भेट देणार आहेत. येथे ते वेस्टर्न नेव्हल कमांड हेडक्वार्टर आणि माझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला भेट देऊ शकतात. जर्मन वृत्तसंस्था डॉयचे वेले ने वृत्त दिले आहे की त्यांच्या भारत भेटीपूर्वी, जर्मन संरक्षण मंत्री म्हणाले होते की भारताचे रशियन शस्त्रांवर सतत अवलंबून राहणे जर्मनीच्या हिताचे नाही. हे स्वतःहून बदलणे हे जर्मनीवर अवलंबून नाही, असे पिस्टोरियस यांनी जकार्ता येथील डीडब्ल्यूच्या शीर्ष राजकीय वार्ताहर नीना हासे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. पिस्टोरियस चार दिवसांच्या भारत भेटीपूर्वी जकार्ता येथे होते.

Posted by : | on : 6 Jun 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g