किमान तापमान : 30.55° C
कमाल तापमान : 30.84° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.15 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.84° C
27.24°C - 30.99°C
few clouds27.63°C - 30.65°C
sky is clear27.77°C - 31.02°C
sky is clear28.29°C - 31.38°C
sky is clear28.45°C - 30.48°C
sky is clear27.86°C - 30.01°C
sky is clear-मोदी आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा,
नवी दिल्ली, (१० ऑक्टोबर) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाशी संबंधित सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना आश्वासन दिले की, या कठीण काळात भारतातील जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका एक्स-पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन करून सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो. पॅलेस्टिनी-इस्रायल संघर्षाचा भाग म्हणून हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी गाझा पट्टीतून मोठा हल्ला केला होता, हे विशेष. या हल्ल्यात इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक हमासच्या दहशतवाद्यांच्या कैदेत आहेत. या संपूर्ण घटनेत भारताने इस्रायलशी एकजूट दाखवली असून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.