|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.72° C

कमाल तापमान : 31.23° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 5.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.23° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 31.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.24°C - 30.77°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.46°C - 30.08°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.57°C - 30.43°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.51°C - 30.58°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

नवी दिल्ली, २७ जून – देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.
सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, ऍलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा थकज ने सल्ला दिला होता.
डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचे म्हणजे हे औषध स्वस्तात उपलब्ध होते.

Posted by : | on : 28 Jun 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g