|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.99° C

कमाल तापमान : 27.12° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

26.99° C

Weather Forecast for
Thursday, 02 May

26.99°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.3°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.48°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28°C - 30.56°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 06 May

28°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.36°C - 29.66°C

few clouds
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-टांझानियात स्थानिक चलनात होणार व्यापार

भारत-टांझानियात स्थानिक चलनात होणार व्यापार

– पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यांच्यात चर्चा,
नवी दिल्ली, (०९ ऑक्टोबर) – भारत दौर्यावर आलेल्या टांझानियाच्या राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या करारांवर सहमती झाली असून, त्यात दोन्ही देशांतील व्यापार स्थानिक चलनात करण्याबाबतच्या कराराचाही समावेश आहे.
भारत आणि टांझानियाच्या संबंधांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. आज आम्ही कित्येक वर्षांपूर्वीचे संबंध धोरणात्मक भागीदारीसोबत जोडत आहोत. परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भारत आणि टांझानिया अत्यंत महत्त्वपूर्ण सहकारी देश आहेत. स्थानिक चलनात व्यापार करण्याच्या मुद्यावर आम्ही काम करीत आहोत. आयसीटी सेंटर्स, व्यावसायिक आणि संरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून टांझानियामध्ये कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण करण्यात भारताने महत्त्वाचे योगदान दिले आहे.
व्यवस्थापन, कृषी, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही सोबत काम करीत आहोत आणि टांझानियातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले. इंटरनॅशनल कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्याबाबत टांझानियाने घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही देश या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी चांगल्या पद्धतीनेे काम करू शकतील. दहशतवाद मानवतेसाठी मोठा धोका असल्याचे भारत आणि टांझानिया मानते. त्यामुळे दहशतवादविरोधी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी यांनी सांगितले.
राष्ट्रपती भवनात स्वागत
यापूर्वी सामिया सुलुहू राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये उत्कृष्ट संबंध आहेत. या दौर्याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील राजनयिक आणि आर्थिक विकासाचे नवीन आयाम खुले होतील, अशी अपेक्षा आहे. आपल्या पूर्वजांनी बनवलेले संबंध येत्या दशकांपर्यंत कायम राहतील, असे सामिया सुलुहू यांनी स्वागतानंतर सांगितले.
या हल्ल्यात अमेरिकेतील चार नागरिकांसह, १० नेपाळी नागरिक मारले गेले. थायलंड परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या १२ नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यात किमान ४ अमेरिकन नागरिक मारले गेले, असे एका अमेरिकी अधिकार्याने सांगितले. हमासने इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात रॉकेट हल्ले केले. दरम्यान, इस्रायलमध्ये दहा नेपाळी नागरिक ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले.
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, इस्रायलमधील हल्ल्यात १२ थाई नागरिक ठार झाले, तर ८ जण जखमी झाले आहेत. आणखी ११ नागरिकांचे अपहरण झाले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या कांचना पत्राचोके यांनी आम्ही इस्रायलमधील सर्व थायलंडच्या नागरिकांना मदत करण्यासाठी काम करीत असल्याचे म्हटले आहे.

Posted by : | on : 9 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g