|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.18° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 65 %

वायू वेग : 5.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.18° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » मध्यमवर्गीयांचे ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!

मध्यमवर्गीयांचे ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला अर्थसंकल्प,
नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सकाळी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. देशातील प्रामाणिक करदाते असलेल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारी तरतूद प्रस्तावित अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अर्थसंकल्पातील नव्या तरतुदीने मध्यमवर्गीयांमध्ये आनंदाची लाट आहे. उत्पन्नावरील करमर्यादेत सूट देण्याची मागणी गेल्या काही काळापासून समाजाच्या विविध स्तरातून केली जात होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारचे हा अंतिम सामान्य अर्थसंकल्प आहे, हे विशेष!
नवीन करप्रणालीनुसार, सात लाख रुपयांच्या मर्यादेत उत्पन्न असलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. जुन्या करप्रणालीनुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नव्हता. मात्र, आता ही स्लॅब वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. नव्या करप्रणालीनुसार बेसिक एक्झेम्पशन मर्यादा ३ लाख रुपये करण्यात आली आहे. आता ६ टॅक्स स्लॅबऐवजी ५ टॅक्स स्लॅब करण्यात आल्या आहेत. नव्या कर प्रणालीनुसार १५.५० लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५२,५०० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन करण्यात आले आहे.
अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या नव्या कररचना खालीलप्रमाणे आहे.
३ ते ६ लाख उत्पन्नावर ५ टक्के
६ ते ९ लाख उत्पन्नावर १० टक्के
९ ते १२ लाख उत्पन्नावर १५ टक्के
१२ ते १५ लाख उत्पन्नावर २० टक्के
१५ आणि त्यापेक्षा जास्त लाखांवर ३० टक्के
विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल लायब्ररीसह अनेक सुविधांची भेट ! विशेष म्हणजे करातून येणारा पैसा हे सरकारचे सर्वात मोठे उत्पन्न आहे. पण, त्यासोबतच कायदेशीर मार्गाने आणि योग्य गुंतवणूक करणा-या करदात्यांना त्यातून सवलतही मिळते, हे विशेष!
अन्…निर्मला सीतारमण म्हणाल्या, सॉरी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बोलताना अचानक त्या चुकल्या आणि संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यामागे कारणही तसेच होते. मात्र तत्काळ त्यांनी आपली चूक सुधारत पुढचे भाषण सुरु केले. झाले असे की, वाहनांच्या धोरणावर बोलताना निर्मला सीतारमण यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असा उच्चार करायचा होता. मात्र, भाषणात त्या ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असं म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांच्याही ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी ‘सॉरी’ म्हणत आपली चूक दुरुस्त केली.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, सॉरी. मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख होता. आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत आहे. राज्य सरकारंही जुनी सरकारी वाहनं आणि जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी सहभाग घेईल, असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.
बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी २.० सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सामान्य बजेटमध्ये काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते जाणून घेऊया.
या गोष्टी झाल्या स्वस्त
एलईडी टीव्ही
कापड
भ्रमणध्वनी
खेळणी
मोबाइल कॅमेरा लेन्स
इलेक्ट्रिक वाहने
हिर्‍याचे दागिने
बायोगॅसशी संबंधित गोष्टी
लिथियमच्या बॅटरी
सायकल
या गोष्टी महागल्या
सिगारेट
दारू
छत्री
सोने
प्लॅटिनम
हिरा
विदेशी स्वयंपाकघर चिमणी
एक्स-रे मशीन
आयात केलेली चांदीची भांडी
धूम्रपान महाग; अर्थसंकल्पात सिगारेटवरील करात १६ टक्क्यांनी वाढ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बुधवारी संसदेत २०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा पूर्ण अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्प येताच नव्या अर्थसंकल्पात आतापासून सिगारेट ओढणार्‍यांच्या खिशावर लक्षणीय परिणाम होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सरकारने सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवली असून, त्यानंतर आता सिगारेटवर १६ टक्के कर भरणे बंधनकारक असणार आहे.
या घोषणेमुळे भारतीय सिगारेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सिगारेटसोबतच सोने, प्लॅटिनम, डायमंड आदींसह इतर अनेक गोष्टींवर सरकारने कर वाढवला आहे. अशा परिस्थितीत आता लवकरच सिगारेटच्या किमती वाढू शकतात. याशिवाय सरकारने काही गोष्टींवरील कस्टम ड्युटी कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सिगारेटवरील १६ टक्के शुल्क वाढवण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ७ मुख्य प्राधान्यक्रमांची यादी केली आहे. ज्यामध्ये हरित विकास, पायाभूत सुविधा, युवा शक्ती, नवीन शक्यता उघडणे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे, आर्थिक क्षेत्र आणि सर्वसमावेशक वाढ यांचा समावेश आहे.

Posted by : | on : 1 Feb 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g