|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.3° C

कमाल तापमान : 30.09° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.74 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.09° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.45°C - 30.7°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.88°C - 30.38°C

light rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » माझी ‘इनिंग’ संपली; सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत

माझी ‘इनिंग’ संपली; सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत

– भारत जोडो यात्रा माझा शेवटचा टप्पा,
रायपूर, (२५ फेब्रुवारी ) – येथे सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. भारत जोडो यात्रा माझ्यासाठी शेवटचा टप्पा होता. या यात्रेमुळे देशातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या जवळ आली, त्यांच्यामुळे माझा पक्ष जिवंत झाला, असे सोनिया गांधी यांनी या बैठकीत नमूद केले. यावेळी त्यांनी भाजपावर हल्ला चढविला. भाजपा सरकार घटनात्मक मूल्य पायदळी तुडवत आहे. संवैधानिक संघटनांवर भाजपा आणि संघाने ताबा मिळविला आहे. भाजपा समाजात तिरस्कार पसरवून अल्पसंख्यकांना लक्ष्य करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकशाही मजबूत होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात आम्ही अतिशय चांगले आणि सक्षम सरकार दिले होते. मात्र, भाजपाने देशापुढे गंभीर आव्हाने उभी केली आहेत. हे सरकार फक्त काही निवडक व्यावसायिकांना मदत करीत आहे. दलित, अल्पसंख्यक आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
‘‘भारत जोडो यात्रा काँग्रेसला संजीवनी देणारी ठरली. ही यात्रा पक्षासाठी मैलाचा दगड सिद्ध झाली. आता माझी इनिंग संपली आहे. अर्थात् आता मी राजकीय संन्यास घेत आहे. २००४ ते २०१४ हा काळ देशासाठी अतिशय चांगला होता.’’
– सोनिया गांधी
देशाच्या हितासाठी लढणार
राहुल गांधी यांनी अतिशय कठीण असलेली भारत जोडो यात्रा शक्य करून दाखवली. दुरावलेली जनता पुन्हा पक्षासोबत आली आहे. देशाच्या हितासाठी लढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. मजबूत कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांनी खाजगी हित बाजूला सारून देशासाठी त्यागाची भावना निर्माण करण्याची गरज आहे. काँग्रेसचा विजय हाच देशाचा विजय राहील आणि मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.
भाजपाचा डीएनए गरीबविरोधी : खडगे
या अधिवेशनाला संबोधित करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनीही भाजपावर टीका केली. भाजपाचा डीएनए गरीबविरोधी आहे. अतिशय कठीण स्थितीतून जात असलेल्या देशाला नव्या आंदोलनाची गरज आहे. ‘सेवा, संघर्ष, बलिदान, सर्वप्रथम हिंदुस्थान’ हाच आपला नारा असेल, असे खडगे यांनी सांगितले.
कार्यकारिणीत ५० टक्के जागा राखीव
काँग्रेस कार्यकारिणीत ५० टक्के जागा अनु. जाती, जमाती, अन्य मागासवर्ग, महिला, तरुण आणि अल्पसंख्यकांसाठी राखीव ठेवण्यासाठी आजच्या बैठकीत पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. याशिवाय, राखीव आणि अनारक्षित स्तरांवरही महिला आणि युवकांकरिता ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

Posted by : | on : 25 Feb 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g