|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.1° C

कमाल तापमान : 33.03° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 67 %

वायू वेग : 4.75 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.03° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.78°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain
Home » राष्ट्रीय, संरक्षण » मिग-२१ विमानांची जागा घेणार ‘तेजस’

मिग-२१ विमानांची जागा घेणार ‘तेजस’

– वायुदलप्रमुख विवेक राम चौधरी यांची माहिती,
नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी बळकट सैन्याच्या गरजेवर भर दिला. आपल्या क्षेत्रातील अस्थिर आणि अनिश्चित भू-राजकीय परिस्थितीमुळे बळकट आणि विश्वसनीय सैन्याची गरज अनिवार्य झाली आहे. मिग-२१ लढाऊ विमाने वायुदलाचा भाग राहणार नाहीत, त्यांची जागा हलके लढाऊ विमान तेजस घेणार आहेत, असे चौधरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
भारत-प्रशांत हे जगाच्या गुरुत्वाकर्षणाचे नवीन आर्थिक आणि धोरणात्मक केंद्र आहे. या माध्यमातून आपल्याला आव्हाने आणि संधीही मिळतात. भारतीय वायुदल आपल्या क्षमतांसह या आव्हानांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल आणि या क्षेत्रात भारताची शक्ती दाखवण्यासाठी आधार बनेल, असे चौधरी म्हणाले. ८३ तेजस एलसीए मार्क-१ विमानांच्या खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आम्ही ८३ एलसीए मार्क-१ एसाठी एक करार केला. आम्हाला असे ९७ विमाने हवी आहेत. ही विमाने मिळाल्यानंतर वायुदलाकडे विमानांची सं‘या १८० होईल. २०२५ पर्यंत मिग-२१ विमाने वायुदलाच्या ताफ्यातूून हटवली जाणार आहेत. मिग-२१ च्या स्क्वाड्रनच्या जागी एलसीए मार्क-१ ए विमानांचा समावेश केला जाईल. या विमानांच्या माध्यमातून मिग-२१ ची कमतरता दूर केली जाईल, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
आम्ही गुप्तचर, पाळत ठेवणे आणि आयएसआरच्या माध्यमातून सीमेपलीकडील परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सीमांच्या पार संसाधनांवर आणि क्षमतांवर उभारण्यावर आम्ही लक्ष देत आहोत. आमच्या परिचालन योजना गतिशील आहेत आणि त्या परिस्थितीनुसार बदलतात, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
तेजस एलसीए एमके-१ ची विशिष्ट्ये
हे तेजस विमानाचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यात कित्येक उपकरणे आहेत. रडार वॉर्मिंग रिसिव्हर, संरक्षणासाठी जामर पॉडसह काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानात हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करणारी घातक शस्त्रास्त्रे आहेत. विमानाचे वजन हलके आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने तयार केलेले हे आपल्या श्रेणीतील सर्वांत हलके आणि लहान मल्टिरोल सुपरसोनिक लढाऊ विमान आहे.

Posted by : | on : 3 Oct 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g