किमान तापमान : 29.97° C
कमाल तापमान : 29.98° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 3.65 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.98° C
28.15°C - 30.46°C
few clouds27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds-९ मे रोजी पुढील सुनावणी,
नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – मुस्लिमांना असलेले चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय ९ मे पर्यंत लागू करण्यात येऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. आपले उत्तर सादर करण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा, अशी विनंती राज्य सरकारने केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. राज्यात मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा पूर्वीचा निर्णय ९ मे पर्यंत कायम ठेवण्यात यावा. या तारखेला आम्ही या प्रकरणी पुढील सुनावणी करू, असे न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या न्यायासनाने स्पष्ट केले.
यावेळी कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे महान्यायाभिकर्ता तुषार मेहता म्हणाले की, सरकारचे उत्तर मी आजच सादर करणार आहे. मात्र, मी स्वत: अडचणीत सापडलो आहे; कारण समलिंगी विवाहाशी संबंधित याचिकांवर सुनावणी करणार्या घटनापीठापुढेही माझा युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे इतर कोणत्याही दिवशी मुस्लिम आरक्षणावरील सुनावणी निश्चित केली जावी. याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे यांनी मेहता यांच्या भूमिकेला विरोध केला. याआधीही सुनावणी चार वेळा पुढे ढकलण्यात आली, याकडे दवे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. यावर मेहता म्हणाले की, न्यायालयाने जो अंतरिम आदेश दिलेला आहे, तो तसाही याचिकाकर्त्यांच्या बाजूनेच आहे.
दवे म्हणाले की, आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ९ मे पर्यंत लागू होणार नाही, अशी ग्वाही तुषार मेहता यांनी दिली असून, न्यायालयाने याची नोंद घ्यावी. यानंतर न्यायालयाने उपरोक्त आदेश देत, सुनावणी ९ मे पर्यंत लांबणीवर टाकली.