किमान तापमान : 32.76° C
कमाल तापमान : 36.25° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 36 %
वायू वेग : 10.09 Mps
स्थळ : Mumbai, IN
36.25° C
29.18°C - 37.99°C
sky is clear28.97°C - 32.73°C
few clouds28.47°C - 32.01°C
sky is clear27.81°C - 30.92°C
sky is clear27.36°C - 30.03°C
sky is clear27.12°C - 30.03°C
sky is clear-कारवाई करण्याचा राज्यांना आदेश,
नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात् यूजीसीने देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली. यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमधील बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. या बोगस विद्यापीठांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश यूजीसीने राज्यांना दिला आहे. विशेष म्हणजे, यात नागपुरातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचाही समावेश आहे.
या यादीत दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅण्ड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, आध्यात्मिक विद्यापीठ, उत्तरप्रदेशमधील गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, भारतीय शिक्षण परिषद, कर्नाटकातील बडगनवी शासकीय जागतिक मुक्त विद्यापीठ, केरळातील सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णतम, पुदुचेरी येथील श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, आंध्रप्रदेशातील क्रईस्ट न्यू टेस्टामेंट मुक्त विद्यापीठ, बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया तसेच कोलकात्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आल्टरनेटिव्ह मेडिसिनचा समावेश आहे.