|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.47° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.08°C - 32.34°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.4°C - 30.6°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.22°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.51°C - 30.46°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 30.55°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.52°C - 30.3°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » यूबीएस ब्रोकरेजने स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग केले कमी

यूबीएस ब्रोकरेजने स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग केले कमी

मुंबई, (१४ ऑक्टोबर) – वैयक्तिक कर्जासारख्या असुरक्षित कर्जात वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती ढासळू शकते; कारण ज्या कर्जदारांकडे आधीच थकबाकी आहे, अशा कर्जदारांना गेल्या काही वर्षांत बँकांकडून दिल्या जाणार्या कर्जाच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असे विदेशी ब्रोकरेज हाऊस यूबीएसने म्हटले आहे. यासोबतच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंगही कमी केले आहे. एसबीआयचे रेटिंग ‘सेल’ आणि अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग ’न्यूट्रल’ असे करण्यात आले आहे. यूबीएसच्या या अहवालामुळे शुक‘वारी एसबीआयचा शेअर १.२२ टक्क्यांच्या घसरणीसह ५७९ रुपयांवर तर, अ‍ॅक्सिस बँकेचा शेअर १.४५ टक्क्यांच्या घसरणीसह १००३.७० रुपयांवर व्यवहार करत होता.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२३ अखेर क्रेडिट कार्ड कर्जावरील बँकांची थकबाकी २.१८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.६८ लाख कोटी रुपये होती. वैयक्तिक कर्जाच्या थकबाकीत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना वैयक्तिक कर्जाबाबत सावध केले होते. ते म्हणाले होते की, अलिकडच्या काळात काही वैयक्तिक कर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर आरबीआय बारीक लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एनबीएफसी खाजगी बँकांपेक्षा वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओवर नादार होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कर्जदारांना कर्ज देतात. १० लाखांपेक्षा जास्त वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा बाजारातील वाटा जूनपर्यंत ३९ टक्के आहे. त्याच वेळी, ५० हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या छोट्या वैयक्तिक कर्जांमध्ये एनबीएफसीचा बाजारातील वाटा सुमारे ७४ टक्के आहे.

Posted by : | on : 14 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g