|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.52° C

कमाल तापमान : 35.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 28 %

वायू वेग : 7.53 Mps

स्थळ : Mumbai, IN

35.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.15°C - 34.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29°C - 31.59°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.46°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.84°C - 29.9°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.67°C - 29.55°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.45°C - 29.53°C

few clouds
Home » राजकीय, राष्ट्रीय » राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा प्रदेशाध्यक्ष बरखास्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा प्रदेशाध्यक्ष बरखास्त

– अजित पवार गटाची कारवाई,
नवी दिल्ली, (१३ जुलै) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निर्देशानुसार पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दहा राज्यांतील अध्यक्षांना तातडीने बरखास्त केले. नवी दिल्लीत एका बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेताना निष्कि‘यता आणि असमाधानकारक कामगिरीमुळे पटेल यांनी दिल्ली, गोवा, पंजाब, बिहार, हरयाणा, मणिपूर, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांतील अध्यक्षांना तातडीने कार्यमुक्त करत, या सर्व राज्यांतील प्रदेश कार्यकारिण्याही बरखास्त केल्या.
या राज्यात अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक पाठवले जाणार असून कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अध्यक्षांची तसेच प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले.
अमित शाह यांना भेटले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही आमची सदिच्छा भेट होती, असे पटेल यांनी सांगितले असले तरी महाराष्ट्रातील खातेवाटपाच्या मुद्यावर यावेळी पवार आणि पटेल यांनी शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
महाराष्ट्रात खातेवाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. अजित पवार अर्थमंत्रालयासह आणि आणखी काही महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसले असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेच्या अनेक फेर्या झाल्यानंतरही ही कोंडी फुटू न शकल्याने पवार यांनी या मुद्यावर दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांतील काही जागांची मागणीही पवार यांनी यावेळी शाह यांच्याकडे केल्याचे समजते.

Posted by : | on : 14 Jul 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g