|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.13° C

कमाल तापमान : 28.7° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 71 %

वायू वेग : 2.97 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.7° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.24°C - 29.75°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.35°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.78°C - 31.16°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.27°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.83°C - 29.94°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.45°C - 29.78°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली, (०५ सप्टेंबर) – आठ राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. द एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालातून ही माहिती समोर आली. राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत एका वर्षात १ हजार ५३१ कोटींनी वाढ झाली. २०२०-२१ मध्ये ७ हजार २९७ कोटी असलेली राष्ट्रीय पक्षांची संपत्ती २०२१ -२२ मध्ये ८ हजार ८२९ कोटींवर गेली आहे. अहवालानुसार, भाजपाच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली. एकट्या भाजपाच्या संपत्तीत एका वर्षात १०५६ कोटींची वाढ झाली. या वाढीसह भाजपाची संपत्ती ६ हजार ०४६ कोटींवर गेली आहे.
काँग्रेसच्या संपत्तीतही वाढ झाली असून, मागील वर्षात ११४ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसची संपत्ती ६९१ कोटी इतकी आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भाकप, माकप, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी या आठ राष्ट्रीय पक्षांचा द एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने केलेल्या अहवालात समावेश होता. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या संपत्तीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे.
कोणाची संपत्ती वाढली तर कोणाची घटली?
*सर्व आकडे कोटींमध्ये
पक्ष — २०२०-२०२१ — २०२१-२०२२ — वाढ/घट
भाजपा — ४,९९० — ६,०४६ — +१०५६
काँग्रेस — ६९१ — ८०५ — +११४
माकप —६५४ — ७३५ — +८०.९८
बसपा — ७३२ — ६९० — -४२
तृणमूल काँग्रेस — १८२ — ४५८ — +२७६
एनसीपी — ३०.९३ — ७४.५३ — +४३.६

Posted by : | on : 5 Sep 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g