|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.89° C

कमाल तापमान : 28.62° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 0.58 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.62° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

28.05°C - 29.72°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.88°C - 29.51°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.72°C - 29.46°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.02°C - 29.72°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.18°C - 30.08°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.28°C - 29.69°C

sky is clear
Home » अर्थ, राष्ट्रीय » वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय

वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय

नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा तर, काही वस्तूंवरील जीएसटी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर एका पत्रपरिषदेत सीतारामन् यांनी याबाबतची माहिती दिली. तरल गुळ पावडरवरील जीएसटी शून्य टक्के करण्यात आला; मात्र हा गुळ पॅकिंगमध्ये आणि त्यावर लेबल असेल तर, त्यावर ५ टक्के जीएसटी लागणार आहे.
पेन्सिल आणि शार्पनरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला. या बैठकीत पानमसाला आणि गुटख्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या दोन्ही वस्तूंवर उत्पादनाच्या आधारे जीएसटी लागू केला जाणार आहे. यावर कॅपसिटी बेस्ड करव्यवस्था लागू होणार आहे.
भरड धान्यावर पुढील बैठकीत निर्णय
भरड धान्यावर जीएसटी लागू करण्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सीतारामन् यांनी सांगितले. या बैठकीत अर्थविषयक मंत्रिसमूहाचे दोन अहवाल स्वीकारण्यात आले. या बैठकीला अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, विविध राज्यांचे अर्थमंत्री आणि अर्थमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
थकबाकी दिली
विविध राज्यांना १६,९८२ कोटी रुपये जीएसटी कराच्या थकबाकीपोटी देण्यात आल्याचे सीतारामन् यांनी सांगितले. २०२१ आणि २२ मध्ये जीएसटी भरपाई चुकीच्या गृहितकावर देण्यात आल्याचा दावा काही राज्यांनी केला. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सर्व राज्यांची एकवाक्यता होणे आवश्यक असल्याचे सीतारामन् यांनी आधीच्या बैठकीत म्हटले होते.

Posted by : | on : 18 Feb 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g