|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.72° C

कमाल तापमान : 31.23° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 5.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.23° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 31.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.24°C - 30.77°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.46°C - 30.08°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.57°C - 30.43°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.51°C - 30.58°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरू

व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरू

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) मान्यता मिळाल्यानंतर देशात रोख हस्तांतरण सेवा सुरू केली आहे, अशी माहिती व्हॉट्‌सऍपने दिली.
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्‌सऍपने २०१८ साली देशात यूपीआयअंतर्गत रोख हस्तांतरण सेवेची चाचणी केली होती. रोख हस्तांतरणासाठी संदेशसेवा मंचाचा वापर केला जात आहे. ‘युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेस’ अर्थात् यूपीआय ही सुविधा देणार्‍या एनपीसीआयने व्हॉट्‌सऍपला वर्गीकृत सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी परवानगी दिली. व्हॉट्‌सऍप ही सेवा कमाल २ कोटी यूपीआय वापरकर्त्यांना सुरुवातीला देऊ शकणार आहे.
देशात ही सेवा सुरू करण्यात आली असून, आता व्हॉट्‌सऍपचे वापरकर्ते देशात रोख हस्तांतरण संदेश पाठविण्याइतपत सुलभतेने करू शकणार आहेत. ग्राहक सुरक्षितपणे आपल्या कुटुंबीयांना किंवा विकत घेतलेल्या वस्तूंचे पैसे पाठवू शकतील अथवा बँकेत न जाता पैसे हस्तांतरित करणे त्यांना शक्य होणार आहे, असे व्हॉट्‌सऍपने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. एनपीसीआयसोबत भागीदारी करून यूपीआयचा वापर करीत पैसे हस्तांतरित करण्याच्या सेवेची रचना करण्यात आली आहे. देशभरातील १६० बँकांच्या माध्यमातून रोख हस्तांतरण शक्य असलेली ही देशातील पहिलीच सेवा आहे, असेही व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्‌सऍपने ही सेवा जगभरात सर्वप्रथम ब्राझीलमध्ये या वर्षी जून महिन्यात सुरू केली. व्हॉट्‌सऍपसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून, येते ४ कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. त्यामुळे पेटीएम, गुगल पे, वॉलमार्टच्या मालकीची फोन पे आणि ऍमेझॉन पेसोबत स्पर्धा करणे व्हॉट्‌सऍपला शक्य होणार आहे. आयफोन आणि अँड्रॉईड भ्रमणध्वनीच्या नवीन आवृत्तीचा वापर करणारे ग्राहक आता आमच्या सेवेचा लाभ घेऊ शकतील. ही सेवा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून, यामुळे देशात रोख हस्तांतरण सेवेचा विस्तार होणार आहे, असे व्हॉट्‌सऍपने ब्लॉगस्पॉटमध्ये म्हटले आहे.

Posted by : | on : 6 Nov 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g