|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » शनिवारीपासून पुन्हा सक्रिय होऊ शकते लॅण्डर-रोव्हर

शनिवारीपासून पुन्हा सक्रिय होऊ शकते लॅण्डर-रोव्हर

बंगळुरू, (२१ सप्टेंबर) – इस्रोची चांद्रयान-३ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मात्र, ही मोहीम पुन्हा सुरू होऊ शकते असे वृत्त आहे. चांद्रयान-३ चे लॅण्डर आणि रोव्हर शनिवारी पुन्हा सक्रिय होऊ शकते, अशी माहिती इस्रोच्या संशोधकांनी दिली. असे झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील केलेल्या प्रयोगांचा डेटा प्रज्ञान रोव्हर पुन्हा इस्रोला पाठवू शकतो.
३ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र झाल्याने विक्रम आणि प्रज्ञानला स्लीप मोडवर टाकण्यात आले होते, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन केंद्राचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले. विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरवर सोलर पॅनल लावले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवस उजेडल्यावर ते रिचार्ज होऊ शकतात. आमच्या योजनेप्रमाणे विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हर शनिवारी सक्रिय होऊ शकतात, असे नीलेश देसाई यांनी सांगितले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सध्या दिवस उगवत आहे. मात्र, या भागात रात्र असताना तापमान उणे १२० ते २०० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे सौर पॅनल व्यवस्थित काम करतील अथवा नाही, हे सांगणे कठीण असल्याचे देसाई म्हणाले.
लॅण्डरवरील चार आणि रोव्हरवरील दोन सेन्सर्स पुन्हा काम करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर असे झाल्यास चंद्रावर आम्ही नवे प्रयोग करू शकू, असे देसाई यांनी सांगितले. एक चांद्रदिवस पृथ्वीच्या १४ दिवसांबरोबर आणि एक चांद्ररात्र पृथ्वीवरील १४ रात्रींच्या बरोबरीत असते. म्हणजे तिथे १४ दिवस उजेड असतो, तर १४ दिवस रात्र असते. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, त्यावेळेस तिथे दिवस उजेडत होता. त्यामुळे १४ दिवस काम केल्यानंतर लॅण्डर आणि रोव्हर स्लीप मोडमध्ये गेले.
इस्रोकडे मोठ्या प्रमाणात डेटा
लॅण्डर आणि रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे, असे संशोधक डॉ. आर. सी. कपूर यांनी विक‘म व प्रज्ञान पुन्हा सकि‘य करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. स्लीप मोडवर टाकण्यात आले, त्यावेळी ही दोन्ही उपकरणे व्यवस्थितपणे काम करीत होती. त्याच्या माध्यमातून इस्रोने मोठ्या प्रमाणात डेटा मिळवला आहे. उपकरण पहिल्याप्रमाणे पुन्हा काम करू शकणार नाही, असेही होऊ शकते. मात्र, काही अपेक्षा आहेत. चांगली बातमी मिळेल, असेही होऊ शकते. चंद्रावर दिवस उजेडणे सुरू झाले आहे. चंद्रावर सूर्योदय होताच, त्याची किरणे थेट सौर पॅनल्सवर पडावीत, अशा स्थितीत प्रज्ञान रोव्हरला ठेवण्यात आले, असे कपूर यांनी सांगितले.

Posted by : | on : 22 Sep 2023
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g