किमान तापमान : 28.66° C
कमाल तापमान : 30.21° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.42 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.21° C
27.24°C - 30.99°C
sky is clear27.45°C - 30.54°C
sky is clear27.69°C - 30.8°C
sky is clear28.08°C - 31.07°C
sky is clear28.26°C - 30.62°C
few clouds27.88°C - 30.09°C
sky is clearनवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्या बहुपक्षीय सरावात भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे. हा सराव २७ फेब्रुवारीपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होईल आणि १७ मार्चपर्यंत चालेल. या युद्धाला एक्स डेझर्ट फ्लॅग असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या सरावात भारतीय हवाई दल पाच हलकी लढाऊ विमाने तेजस आणि दोन सी-१७ सह सहभागी होणार आहे. एलसीए तेजसची निर्मिती फक्त भारतातच करण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाने भारतात बनवलेल्या एलसीए तेजस लढाऊ विमानाचा देशाबाहेरील कोणत्याही सरावात समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग हा एक बहुपक्षीय सराव असून भारतीय हवाई दल तसेच यूएई, फ्रान्स, कुवेत, ऑस्ट्रेलिया, यूके, बहरीन, मोरोक्को, स्पेन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांचे हवाई दल या सरावात सहभागी होणार आहेत. भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे की या सरावाचा उद्देश जगातील सर्वोत्तम हवाई दलांसोबत विविध लढाऊ क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे आणि सराव करणे हा आहे.