|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.88° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.48°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » गुन्हे-न्याय, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाने केली ललित मोदींवरील कारवाई बंद

सुप्रीम कोर्टाने केली ललित मोदींवरील कारवाई बंद

-आम्ही बिनशर्त माफी मोठ्या मनाने स्वीकारतो,
नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – आम्ही बिनशर्त मागितलेली माफी मोठ्या मनाने स्वीकारतो. न्यायालय नेहमीच माफीवर विश्वास ठेवते. विशेषत: जेव्हा माफी बिनशर्त आणि मनापासून मागितली असेल, तर आम्ही न्यायालय अवमान प्रकरणाची कारवाई बंद करतो, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल ) माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावरील अवमान कारवाई रद्द केली.
ललित मोदी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविरुद्ध टिप्पणी करणारी पोस्ट समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. याविरोधात ज्येष्ठ वकील उदय सिंह चंदर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्या. एम.आर. शाह आणि न्या. सी. टी. रवी यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. ललित मोदी यांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, ललित मोदी यांनी १७ एप्रिल रोजी सोशल मीडियावरील पोस्टसाठी बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करून, ललित मोदींनी ट्विटरवर तसेच वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित केला आहे. संबंधित पोस्ट लगेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हटवण्यात आली होती. ती आता उपलब्ध नाही. ललित मोदी यांनी सादर केलेला बिनशर्त माफीनामा प्रामाणिक आहे.
माफीनाम्यात ललित मोदी म्हणतात…
आपल्या माफीनाम्यात ललित मोदी यांनी म्हटले होते की, मी १३ जानेवारी ते ३० मार्च या कालावधी केलेल्या माझ्या ट्विटसाठी बिनशर्त जाहीर माफी मागतो. भारतीय न्यायव्यवस्था आणि माननीय न्यायालयांचे वैभव आणि प्रतिष्ठेशी विसंगत असे कोणतेही काम मी करणार नाही. भारतीय न्यायपालिकेची प्रतिमा मलिन माझा करण्याचा हेतू नव्हता.

Posted by : | on : 25 Apr 2023
Filed under : गुन्हे-न्याय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g