|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.19° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश

हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश

राजनाथसिंह यांचे संसदेत निवेदन,
नवी दिल्ली, ९ डिसेंबर –
तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीनही दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि ११ अधिकार्‍यांच्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज संसदेत निवेदन करताना दिली. ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखाली तीनही दलांकडून चौकशी करण्याचा आदेश भारतीय वायुदलाने दिला आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
संसदेच्या सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून जनरल रावत यांच्यासह अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. बुधवारी हेलिकॉप्टर कोसळून देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला, अशी दुर्दैवी माहिती दुःखद अंत:करणाने मी तुम्हाला देत असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. ही चौकशी बुधवारीच सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जनरल बिपीन रावत वेलिंग्टन येथे जात होते. सुलुर येथील वायुतळावरून वायुदलाच्या एमआय-१७ व्ही ५ या हेलिकॉप्टरने सकाळी ११.४८ वाजता उड्डाण केले. वेलिंग्टन येथे हे हेलिकॉप्टर दुपारी १२.१५ वाजता उतरणे अपेक्षित होते. दुपारी १२.०८ वाजता सुलुर वायुतळावरील वाहतूक नियंत्रण कक्षाचा हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर येथील स्थानिकांना जंगलात आग लागलेली दिसली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर त्यांना हेलिकॉप्टरचा जळत असलेला सांगाडा दिसला. स्थानिक प्रशासनाचे बचावपथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळावर वाचलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
हेलिकॉप्टरच्या मलब्यात अडकलेल्यांना बाहेर काढून वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथसिंह यांनी दिली. या अपघातातून वाचलेले ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांच्यावरील उपचारासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
बिपीन रावत यांच्या पार्थिवावर आज अन्त्यसंस्कार
सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर उद्या शुक्रवारी दिल्ली केन्ट येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचे पार्थिव शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अन्त्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सायंकाळी कामराज मार्ग येथून दिल्ली कॅन्टमधीलबरार स्क्वेअर स्मशानभूमीपर्यंत अन्त्ययात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील.

Posted by : | on : 9 Dec 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g