|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.53° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 2.35 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.23°C - 30.64°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear
Home » राष्ट्रीय, संरक्षण » १०० वे सुखोई-३० हवाई दलाकडे सुपूर्द

१०० वे सुखोई-३० हवाई दलाकडे सुपूर्द

– एचएएलची जबरदस्त कामगिरी,
नाशिक, (०८ एप्रिल) – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शुक्रवारी १०० वे सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग करून हवाई दलाच्या सुपूर्द केले. यासह, शुक्रवारीच एचएएलने लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजसचे उत्पादन वाढवण्यासाठी तिसरी असेम्बली लाईन उघडली आहे, ज्याचे उद्घाटन देशाचे संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी केले. संरक्षण बाजारपेठेत आक्रमकपणे स्पर्धा करण्यासाठी आणि मानवरहित वाहनांसारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एचएएलला पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी शुक‘वारी एचएएलच्या नाशिक विभागात लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) निर्मितीसाठी नवीन प्लांटचे उद्घाटन केले. ही तिसरी असेम्बली लाईन उघडल्याने एलसीएच्या उत्पादनाला गती मिळेल. एलसीए सुरुवातीला एलसीए मार्क-१ आणि मार्क-१ए ची १८ ट्रेनर विमाने तयार करणार आहे, ज्यापैकी पहिल्या एफओसी ट्रेनरने ५ एप्रिल रोजी ३५ मिनिटांसाठी हवेत पहिले उड्डाण केले. एलसीएच्या दुसर्या असेम्बली लाईनचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी बंगळुरू युनिटमध्ये करण्यात आले होते. त्याच्या दुसर्या दिवशी एरो इंडिया दरम्यान एचएएलकडून ८३ एलसीए विमानांचा करार झाला.
हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांची एचएएलच्या नाशिक विभागातच दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग करून आधुनिकीकरण केले जात आहे. १०० व्या सुखोई विमानाचे सिग्नल आऊट सर्टिफिकेट (एसओसी) हवाई दलाचे असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ एअर व्हाइस मार्शल सरीन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपस्थित एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनंतकृष्णन उपस्थित होते. अनेक आव्हाने असूनही एचएएलचा नाशिक विभाग दरवर्षी २० सुखोई-३० विमानांची दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 8 Apr 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g