|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.43° C

कमाल तापमान : 32.14° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 7.93 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.14° C

Weather Forecast for
Sunday, 12 May

28.43°C - 32.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.76°C - 31.18°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

29.02°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

27.79°C - 30.87°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.99°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 17 May

29.38°C - 30.81°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » ५१ हजार कोटींच्या पीएम गतिशक्ती प्रकल्पांना मंजुरी

५१ हजार कोटींच्या पीएम गतिशक्ती प्रकल्पांना मंजुरी

-रस्ते महामार्ग आणि रेल्वेसंबंधी योजनांचा समावेश,
नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – केंद्र सरकारने पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान (एमएनपी) अंतर्गत एकूण ५१ हजार ७०० कोटी रुपयांच्या सहा पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली. यात रस्ते महामार्ग आणि रेल्वेसंबंधी योजनांचा समावेश असल्याचे सूत्राने सांगितले. माहितीनुसार, पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लानिंग ग्रुप (एनपीजी) च्या ५६ व्या बैठकीत रस्ते महामार्गसंदर्भातील चार योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावर ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या दोन योजनांचा समावेश आहे. पहिल्या महामार्ग योजनेत गुजरात आणि महाराष्ट- राज्य अंतर्भूत आहेत. यात नवसारी, वलसाड, नासिक, अहमदनगर जिल्ह्यांतील रस्तेमार्गांचा समावेश आहे. याद्वारे आदिवासी क्षेत्रांचा सामाजिक आणि आर्थिक विकासावर भर देण्यात आला असून, पर्यटन क्षेत्रांनाही जोडण्यात आले आहेत.
दुसर्या योजनेत बनासकांठा, पाटण, महेसाणा, गांधीनगर, अहमदाबाद हा भाग अमृतसर-जामनगर आर्थिक क्षेत्रासोबत जोडण्यात येणार आहे. तिसर्या योजनेत बिहारमधील पाटणा-आरा-सासाराम भागाचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय हे क्षेत्र जलमार्गांसोबतही जोडण्यात येणार आहे. तर, चौथ्या योजनेत उत्तर प्रदेश समाविष्ट असून, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड राज्यांसोबत महामार्गाने जोडण्यात येणार आहे. दरम्यान, गतिशक्ती अंतर्गत ओडिशा आणि केरळमधील दोन रेल्वे योजनांना समाविष्ट केले आहे. ओडिशातील गंजम, नयागड, खंडमाल, बौध, संबलपूर, अंगुल जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने औद्योगिक मागास क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. केरळमध्ये रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण होणार असून, यात प्रवासी आणि मालवाहतूक मार्गांचा समावेश आहे.

Posted by : | on : 30 Sep 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g