|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:55 | सूर्यास्त : 18:50
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.36° C

कमाल तापमान : 29.78° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.49 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.78° C

Weather Forecast for
Wednesday, 15 May

29.61°C - 32.58°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.92°C - 30.8°C

light rain
Weather Forecast for
Friday, 17 May

28.95°C - 30.53°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 18 May

29.38°C - 30.33°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.57°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.56°C - 30.67°C

few clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » बायडेन, हॅरिस ठरले पर्सन ऑफ द इयर

बायडेन, हॅरिस ठरले पर्सन ऑफ द इयर

न्यूयॉर्क, १२ डिसेंबर – अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्यो बायडेन आणि नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर २०२० म्हणून निवड केली आहे. दोन्ही नेत्यांनी अमेरिकेचे वर्तमान बदलले असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरवर्षी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी कोरोना महामारी काळात सातत्याने सेवा देणारे आरोग्यसेवक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फे क्शिअस डीसीजेसचे संचालक डॉ. अँथनी फाऊसी, वंशभेदांविरोधात न्याय मिळविण्यासाठी सुरू असलेली चळवळ आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम यादीत होते. ट्रम्प यांनी मागील चार वर्षांमध्ये विघटन आणि विभाजनाला बळ दिले, तर बायडेन आणि हॅरिस यांनी बदलता वर्तमान दाखवून दिला. अमेरिका टिकू न राहायची असेल तर वैविध्याचा धागा, जगण्याचे वेगवेगळे अनुभव आणि जागतिक दृष्टिकोन आदींची सरमिसळ आवश्यक आहे, असे टाइम प्रकाशनाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, डॉ. फाऊसी, आरोग्यसेवक आणि वांशिक भेदांविरोधातील चळवळ यांना गार्डियन्स ऑफ द इयर २०२० म्हणून जाहीर केले. झूमचे सीईओ एरिक युवान यांना टाइम्स बिझनेस पर्सन ऑफ द इयर, कोरियाचा तरुणांमधील लोकप्रिय बँड बीटीएसला एंटरटेनर ऑय द इयर, तर अमेरिकी बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स याला ऍथलिट ऑफ द इयर म्हणून घोषित केले.
भारतीय राहुल दुबे सन्मानित
दरम्यान, राहुल दुबे यांनाही टाइम हिरोज ऑफच्या यादीत स्थान मिळाले आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांच्या काळात दुबे यांनी वॉशिंग्टनमधील राहत्या घरी ७० आंदोलकांना आश्रय दिला होता. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन काम केल्याबद्दल दुबे यांचा गौरव केला जात असल्याचे टाइमने म्हटले आहे.

Posted by : | on : 12 Dec 2020
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g