किमान तापमान : 31.01° C
कमाल तापमान : 32.33° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.69 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.33° C
28.14°C - 32.99°C
few clouds28.38°C - 31.29°C
sky is clear28.82°C - 32.87°C
sky is clear29.01°C - 32.87°C
sky is clear28.9°C - 32.28°C
sky is clear28.21°C - 30.5°C
sky is clear=ऍक्सिस बँकेचा पुढाकार=
मुंबई, [३ डिसेंबर] – ऍक्सिस या देशातील तिसर्या क्रमांकाच्या खाजगी बँकेने एनआरआय खातेधारक प्रवासी भारतीय ग्राहकांसाठी डिस्प्ले असलेले डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे आता आर्थिक व्यवहारांदरम्यान एसएमएसद्वारे वन टाईम पासवर्ड मिळवण्याची गरज राहणार नाही.
या डिस्प्ले कार्डमध्ये ईएमव्ही चिप, डिस्प्ले स्क्रीन आणि टच सेन्सिटीव्ह बटन लावण्यात आले असून, यामुळे कार्डवरच ओटीपी जनरेट करता येईल. ग्राहकांचा युझर आयडी आणि पासवर्ड याचे कॉम्बिनेशन करून तयार झालेल्या या पासवर्डच्या साहाय्याने ग्राहकांना इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील. अशा प्रकारचे डिस्प्ले कार्ड बनवणारी ही पहिलीच बँक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, याकरिता किती शुल्क आकारण्यात येणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.