Posted by वृत्तभारती
Friday, March 1st, 2024
नवी दिल्ली, (०१ मार्च) – अदानी समूह येत्या काही वर्षात मध्य प्रदेशात पॉवर प्लांट, महाकाल एक्स्प्रेस वे आणि सिमेंट ग्राइंडिंग युनिट्सच्या उभारणीसाठी सुमारे ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. समूहाच्या एका उच्चपदस्थ अधिकार्याने शुक्रवारी ही माहिती दिली. अदानी समूहाने राज्यात यापूर्वीच १८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे प्रणव अदानी, समूह व्यवस्थापकीय संचालक (कृषी, तेल आणि वायू) आणि अदानी एंटरप्रायझेसचे संचालक यांनी शुक्रवारी उज्जैन येथील प्रादेशिक उद्योग परिषदेत ही घोषणा केली....
1 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 1st, 2024
नवी दिल्ली, (०१ मार्च) – टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स शुक्रवारी ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह ७६३५.१० रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या समभागांसाठी हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. मंत्रिमंडळाने गुरुवारी ३ सेमीकंडक्टर प्लांटच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, त्यापैकी २ सेमीकंडक्टर प्लांट टाटा ग्रुप उभारणार आहेत. या सेमीकंडक्टर प्लांट्सवर १.२६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या तिन्ही युनिटचे बांधकाम येत्या १०० दिवसांत सुरू होईल. कंपनीच्या शेअर्समध्ये...
1 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 1st, 2024
नवी दिल्ली, (०१ मार्च) – चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्याची सुरुवात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगली होऊ शकली नसती. सेन्सेक्स आणि निफ्टीने आज म्हणजेच १ मार्च रोजी त्यांचे जुने रेकॉर्ड तोडले. यासह शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स १३१८ अंकांच्या वाढीसह ७३,८१९.२१ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. त्याचवेळी निफ्टीने २२,३५३.३० ही सर्वोच्च पातळी गाठण्यात यश मिळवले आहे. शुक्रवारी एनएसई १.६२ टक्क्यांच्या वाढीसह २२,३३८.७५ वर बंद झाला आणि सेन्सेक्स १२४५.३४ अंकांच्या किंवा...
1 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 1st, 2024
– कमाई रु १.६८ लाख कोटी पार, नवी दिल्ली, (०१ मार्च) – देशांतर्गत व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन फेब्रुवारीमध्ये १२.५% वाढून १.६८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असल्याचे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत एकूण जीएसटी संकलन १८.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील संकलनापेक्षा हे ११.७% अधिक आहे. चालू आर्थिक वर्षातील सरासरी मासिक सकल संकलन १.६७ लाख कोटी रुपये...
1 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ फेब्रुवारी ) – भारतीय सराफा बाजारात आज, १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सोन्याच्या किमतीत घट आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ६५ हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५६,३४३ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ६५४७४ रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी...
16 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 14th, 2023
मुंबई, (१४ फेब्रुवारी ) – जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणातही देशांतर्गत बाजारात बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स विक‘ीच्या दबावाखाली राहिले. त्यामुळे निर्देशांक आणि निफ्टीत घसरण नोंदविण्यात आली. मुंबई बाजारातील निर्देशांकात दिवसअखेर २५१ अंकांची घसरण झाली आणि तो ६०,४३२ वर बंद झाला. दिवसभरात तो एका क्षणी ६०,२४५ इतका खाली आला होता. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीतही २.८३ टक्क्यांची घसरण झाली. तो १७,७७१ वर बंद झाला. दिवसभरातील कारभारात सर्वाधिक तोटा एसबीआयच्या शेअर्सना झाला. त्यापाठोपाठ इन्फोसिस,...
14 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 2nd, 2023
नवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – बिरला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्याश्री बिरला हिने आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवली असून, आता लवकरच ती आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक घराण्यांमध्ये तरुण पिढीच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेले कुमार मंगलम बिरला यांनीही त्यांच्या वारसांकडे जबाबदारी सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कुमार मंगलम बिरला यांची मुलगी अनन्याश्री बिरला आणि मुलगा...
2 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 26th, 2023
टी प्लस वन सेटलमेंट लागू, चीननंतरचा दुसरा देश, मुंबई, (२५ जानेवारी) – शेअर्स विकल्यानंतर रक्कम डिमॅट खात्यात येण्यासाठी गुंतवणूकदारांना आता दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही. देशातील सर्वांत मोठ्या २०० सूचीबद्ध कंपन्या आता सेटलमेंटच्या टी प्लस वन सायकलमध्ये शिफ्ट झाल्या आहेत. शुक्रवारपासून रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि अदानी एंटरप्रायझेस टी प्लस वनच्या आधारावर व्यवहार करतील. यापूर्वी हा व्यापार सेटलमेंट टी प्लस टूच्या आधारावर म्हणजे दोन दिवसांच्या आधारावर केला जात होता. टी...
26 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2017
मुंबई, २ सप्टेंबर – रिलायन्सच्या तब्बल ६० लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी ६० लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणार्या रिलायन्स रिटेलने केला आहे.२४ ऑगस्टपासून जिओच्या संकेतस्थळावर फोनची नोंदणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी जवळपास ६० लाख ग्राहकांनी नोंदणी केल्याचा दावा रिलायन्स रिटेलने केला आहे. जिओ फोनची नवरात्रीपासून डिलेव्हरी केली जाणार असून...
3 Sep 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 4th, 2016
=फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देणारी नवी योजना सादर केली आहे. एक रुपयापेक्षाही कमी किमतीत बीएसएनएल एक जीबी डाटा देणार आहे. बीएसएनएल ९ सप्टेंबरपासून ही योजना सुरू करत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी ही योजना असणार आहे. या योजनेतर्ंगत २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा...
4 Sep 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
=दुसर्या कार्यकाळासाठी राजन उत्सुक= लंडन, [१३ मे] – रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले असून, अजून बरेच काही करायचे बाकी असल्याचे सांगून आपण दुसर्या कार्यकाळासाठी उत्सुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार असून, सुब्रमण्यम् स्वामी यांच्यासह सत्तारूढ भाजपातील काही घटकांचा रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास विरोध आहे, हे विशेष. पोषक वातावरण...
14 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 29th, 2016
नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिंगिंग बेल्स कंपनी आपल्या ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या तयारीत आहे. ईडी कंपनीच्या खात्याची आणि व्यवहाराची चौकशी करीत असली, तरी यासंबंधात कंपनीला नोटीस पाठविण्यात आलेली नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. केवळ २५१ रुपयात स्मार्टफोन देणारी ही कंपनी सध्या देशभरात चर्चेत आहे....
29 Feb 2016 / No Comment / Read More »