किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशटी प्लस वन सेटलमेंट लागू, चीननंतरचा दुसरा देश,
मुंबई, (२५ जानेवारी) – शेअर्स विकल्यानंतर रक्कम डिमॅट खात्यात येण्यासाठी गुंतवणूकदारांना आता दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही. देशातील सर्वांत मोठ्या २०० सूचीबद्ध कंपन्या आता सेटलमेंटच्या टी प्लस वन सायकलमध्ये शिफ्ट झाल्या आहेत. शुक्रवारपासून रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि अदानी एंटरप्रायझेस टी प्लस वनच्या आधारावर व्यवहार करतील. यापूर्वी हा व्यापार सेटलमेंट टी प्लस टूच्या आधारावर म्हणजे दोन दिवसांच्या आधारावर केला जात होता. टी प्लस वन सेटलमेंट लागू करणारा भारत हा जगातील चीननंतर दुसरा देश आहे.
भारत आता टी प्लस टू सेटलमेंटवरून टी प्लस वन सेलटमेंटकडे वळतो आहे. सर्वांत कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये याची अंमलबजावणी मागील वर्षी फेब्रुवारीपासून झाली आहे. टी प्लस वन सेटलमेंट म्हणजे सिक्युरिटीची विक्री किंवा खरेदी तुमच्या डीमॅट खात्यात ज्या दिवशी तुम्ही ट्रेड फायनल केला असेल, त्याच दिवशी झाल्याचे दिसून येईल. पूर्वी यासाठी दोन दिवस लागायचे. सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीने बाजाराला अधिक स्थिरता प्रदान करण्यासाठ टी प्लस वन आणि टी प्लस टू सेटलमेंट निवडण्याची संधी दिली होती.
टी प्लस वन सेटलमेंटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तो गुंतवणूकदारांना चांगली तरलता देतो. त्यामुळे शेअर्सची विक्री झाल्यानंतर केवळ एकाच दिवसात खात्यात पैसे जमा होतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज शेअर विकला तर, उद्या पैसे त्याच्या डिमॅट खात्यात दिसू लागतील. जितक्या लवकर पैसे डिमॅट खात्यात परावर्तित होतील, तितक्या लवकर तो काढू शकेल. यानंतर तो त्याची पुन्हा गुंतवणूक करू शकतो किंवा त्याच्या इतर कोणत्याही वैयक्तिक कामाची पूर्तता करू शकतो.