Posted by वृत्तभारती
Thursday, February 13th, 2014
नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – भारतीय बाजारपेठेतील संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा लागली असून, अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील संगणकाच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १९.९ टक्क्यांची घट झाली आहे. गार्टनर या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करत असलेल्या कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, मागील तिमाहीत भारतात १.९६ लाख संगणकाची विक्री झाली असून, भारतीय संगणक बाजार...
13 Feb 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 8th, 2014
=आजच उरकून घ्या कामे!= मुंबई, (७ फेब्रुवारी) – रविवारची सुटी आणि नंतर दोन दिवस बँक कर्मचार्यांनी पुकारलेला संप यामुळे तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे आणि महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे चाकरमान्यांना उद्या शनिवारीच आपली बँकांची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत. देशभरातील बँक कर्मचार्यांनी रखडलेल्या वेतनवाढीचा प्रश्न आणि बँकिंगमधील सुधारणा थांबवाव्यात, या मुख्य मागण्यांसाठी सोमवारी आणि मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे. बँकांना शनिवारी अर्धी सुटी, रविवारची साप्ताहिक सुटी, सोमवार व...
8 Feb 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 7th, 2014
टोकियो, (६ फेब्रुवारी) – सोनी कंपनीने इलेक्ट्रॉनिक व्यापारात होत असलेल्या तोटा कमी करण्यासाठी आखलेल्या पूर्व निर्धारित योजनेनुसार ५००० कामगारांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एकूण ९८८ दशलक्ष डॉलरचे वार्षिक खर्च असलेल्या संगणक आणि दूरदर्शन संच उत्पादनाच्या प्रकल्पाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनी कंपनीचा संगणक विभाग जपान औद्योगिक भागीदारांना विकली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी जपान औद्योगिक भागीदारांकडून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना देखील केली जाणार आहे. या...
7 Feb 2014 / Comments Off on ‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्यांवर बेकारीची कुर्हाड / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 31st, 2014
नवी दिल्ली, (३० जानेवारी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचे व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ग्राहकांचा कल आता वाढला आहे. त्यामुळे बँकेत दिसणार्या लांबच लांब रांगा जरी दिसेनाशा झाल्या असल्या, तरी एक नवाच धोका मात्र निर्माण झाला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञांनी बँकींग क्षेत्रात दाखल झालेल्या एका नव्या व्हायरसचा शोध लावला आहे. देशभरातील ऑनलाईन बँकींगसाठी धोकादायक असलेला ‘ब्लॅक व्हायरस’ ग्राहकांची वैयक्तिक माहिती काढून घेण्यास सक्षम आहे. सरकारच्या वतीने ग्राहकांसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्ड स्वॅप...
31 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 19th, 2014
=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी= नवी दिल्ली, ( १८ जानेवारी) – कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील निधी स्थानांतरित करण्याच्या समस्येपासून इपीएफओच्या सदस्यांना लवकरच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून हे धोरण अंमलात आणण्याचे संकेत ईपीएफओने दिले आहेत. नोकरीत बदल करताना पीएफ निधी स्थानांतरित करण्यासाठी खातेधारकाला ईपीएफओकडे अर्ज करावा...
19 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 4th, 2014
=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय= नवी दिल्ली, (३ जानेवारी) – बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम मशिन्समुळे पार विसरूनच गेलो आहोत. पण, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्यावर बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याचीच वेळ येणार आहे. एटीएममधून पैसे काढणार्या ग्राहकांकडून निश्चित शुल्क वसूल करण्याचे अधिकार बँकांना देण्याचा विषय आरबीआयच्या विचाराधीन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी एटीएम सेवेसाठी बँका शुल्क वसूल...
4 Jan 2014 / No Comment / Read More »