|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.66° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.85°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.95°C - 32.13°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.1°C - 31.46°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.9°C - 31.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.05°C - 29.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.62°C - 28.99°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद

कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद

=आजच उरकून घ्या कामे!=
मुंबई, (७ फेब्रुवारी) – रविवारची सुटी आणि नंतर दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे आणि महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे चाकरमान्यांना उद्या शनिवारीच आपली बँकांची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत. देशभरातील बँक कर्मचार्‍यांनी रखडलेल्या वेतनवाढीचा प्रश्‍न आणि बँकिंगमधील सुधारणा थांबवाव्यात, या मुख्य मागण्यांसाठी सोमवारी आणि मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे.
बँकांना शनिवारी अर्धी सुटी, रविवारची साप्ताहिक सुटी, सोमवार व मंगळवार या सलग दोन दिवशी बँक कर्मचार्‍यांचा संप आहे. त्यामुळे या चार दिवसांत बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे आठ लाख बँक कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. वेतनवाढीबाबत बँक कर्मचार्‍यांची संघटना युएफबीयुने केंद्रीय कामगार आयोग आणि इंडियन बँक्स असोसिएशनशी चर्चा केली. मात्र, या चर्चा निष्फळ ठरल्याने बँक कर्मचार्‍यांच्या संघटनेने संपाचे हे हत्यार उपसले आहे.

Posted by : | on : 8 Feb 2014
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g